Home Blog Page 73

वेडा वाकडा गाईन….!

डॉ. रुपेश पाटकर

आम्हाला शाळेत असताना आठवी ते दहावी या इयत्तांत संस्कृत भाषा घेण्याची मुभा असे. आमच्या शाळेत शंभर गुणांचे संस्कृत नव्हते. त्यामुळे पन्नास गुणांचे हिंदी आणि पन्नास गुणांचे संस्कृत घ्यावे लागे. पण संस्कृत शिकण्याचा आनंद शंभर गुणांचाच मिळे. याचे कारण म्हणजे आम्हाला संस्कृत शिकवणारे सिधये सर. ते स्वतः संस्कृत पाठशाळेत शिकले होते. त्यांची शिकवण्याची हातोटी खूपच सुंदर होती. त्यांचा तास ही आमच्यासाठी परवणी असे. ते कधी ऑफ तासाला आले तर पंचतंत्रील एखादी गोष्ट सांगत. एकच गोष्ट उपलब्ध वेळेनुसार कमीअधिक करून सांगण्यात त्यांची हातोटी असे. त्यांनी गोष्ट कितीही वेळ घेऊन सांगितलेली असली तरी प्रत्येकवेळी ऐकणार्‍याला रोचक वाटे. गोष्टींप्रमाणे पुस्तकाबाहेरील संस्कृत सुभाषिते ऐकवणे हीदेखील त्यांची विशेषता होती. शुद्धलेखन आणि शुद्ध उच्चारांबाबत आग्रही असलेल्या सिधये सरांनी एकदा आम्हाला खूपच गमतीशीर सुभाषित ऐकवले.
मूर्खो वदति विष्णाय धीरो वदति विष्णवे!
तयो फलं तु तुल्यं हि भावग्राही जनार्दनः!!
याचा मी केलेला मराठी अनुवाद,
गावठी म्हणे विष्णूले पंडित म्हणे विष्णुला!
दोघांनाही समान पुण्य भाव पाहतो जनार्दन!!
म्हणजे परमेश्वर भक्ताचा भाव बघतो, त्याची प्रार्थना व्याकरणदृष्ट्या किती बरोबर आणि किती चूक हे पाहत नाही. मला हे सुभाषित खूपच आवडले. कारण ते खूप आश्वासक होते.
मी गेल्यावर बाबांना ते ऐकवले. ते म्हणाले, “भाव तोचि देव! गीतेच्या सतराव्या अध्यायात अर्जुन भगवंतांना याच संदर्भात प्रश्न विचारतो,
जे शास्त्र मार्ग सोडूनि श्रद्धापूर्वक पूजिती!
त्यांची सात्विक ती निष्ठा किंवा राजस तामस!!
यावर भगवान सांगतात की प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या स्वभावाप्रमाणे असते. शास्त्र माहीत नसले म्हणून काही बिघडत नाही. तुमचा भाव काय आहे तो महत्त्वाचा.
पण याच्या उलट असेही अनेक लोक असतात ज्यांना ‘प्रस्थानत्रयी’ तोंडपाठ असते, त्यांना धर्माचे शास्त्र माहीत असते, पण त्यांना परमेश्वराची ओढ नसते. स्वत:ला शास्त्र समजते, याचाच त्यांना अभिमान असतो. ते आपल्या नावामागे शास्त्री, पंडित वगैरे बिरुदे लावून मिरवत असतात. ते इतरांना तुच्छ लेखतात. अशा लोकांना उद्देशून आदी शंकराचार्य ‘भज गोविंदम्’ मध्ये म्हणतात,
भज गोविंदम् भज गोविंदम्
गोविंदम् भज मूढमते
संप्राप्ते सन्निही ते काले
नही नही रक्षति डुक करणे!
म्हणजे जेव्हा मरण समोर उभे राहते तेव्हा व्याकरणाचे नियम उपयोगी पडत नाहीत. तेव्हा हे मूर्खा, गोविंदाला म्हणजे परमेश्वराला भज.
दुसरे काही असेही लोक असतात, जे संपत्ती, सत्ता, चैनीच्या वस्तू वगैरे लौकिक गोष्टी साध्य करण्यासाठीच देवाला भजतात. लौकिक गोष्टी प्राप्त करणे एवढेच त्यांचे ध्येय असते. त्यांना त्यांच्या लौकिक इच्छा पूर्ण करणारे एक यंत्र म्हणून देव हवा असतो. त्यांना नवसाला पावणारा देव हवा असतो. त्यांना मुक्ती नको असते. त्यांना देवाशी तादात्म्य पावायचे नसते. त्यांच्या कल्पनेतला देव हा अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यातून येणार्‍या राक्षसासारखा असतो. अशा लोकांची श्रद्धा ही राजस किंवा तामस असते.”
“बाबा, धार्मिक शास्त्रांचा अभ्यास नसताना देखील माणूस देवाच्या जवळ पोचू शकतो का?” मी विचारले.
“तू या प्रश्नाचा स्वतःच विचार केलास तरी तुला तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मिळेल. संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा वगैरे मंडळी धर्मशास्त्र अभ्यासायला कुठे गेली होती? त्यांनी धर्मशास्त्र शिकायचे ठरवले असते तरी त्यांना ते शिकवायला कोणता पंडित तयार झाला असता? जनाबाई तर नामदेवांच्या घरात वाढलेली अनाथ मुलगी. तिचा बहुतांश वेळ घरकाम करण्यात जायचा. कान्होपात्रा तर वेश्येची मुलगी. आणि चोखोबा अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या महार जातीतले. पण ही सगळी मंडळी औपचारिक शास्त्र न शिकतादेखील संत झाली, मोक्षाची अधिकारी झाली. एवढेच नव्हे तर ती इतरांना अध्यात्माचा मार्ग दाखवणारी गुरू झाली,” बाबा म्हणाले.
मी चोखोबांवरचा ‘ही वाट पंढरीची’ हा सिनेमा पाहीला होता. चोखोबा महार जातीत जन्मलेले. महार ही अस्पृश्य मानण्यात येणार्‍या जातींपैकी एक जात. अस्पृश्य म्हणजे भारतीय समाजातील सर्वात जास्त छळ सोसावा लागणाऱ्या जाती. अख्ख्या गावाच्याच गुलाम असलेल्या या जाती.
अठरा विश्वे दारिद्र्य हेच त्यांचे भूत, वर्तमान आणि भविष्य. कष्ट, छळ आणि अवहेलना नित्याचेच. आयुष्यात नवा कपडा कधी अंगावर चढणार नाही की पोटभर कधी अन्न मिळणार नाही.
अशा परिस्थितीत जगणारे चोखोबा. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘आम्हा अधिकार उच्छिष्ट सेवन!’ म्हणजे ‘उष्टे खाण्याचाच आपल्याला अधिकार’ अशी परिस्थिती. म्हणजे शास्त्र, धर्म, पुराण, स्तोत्रे कानावर पडण्याची दुरान्वयेदेखील शक्यता नाही.
अशा परिस्थितीतून चोखोबा आध्यात्मिक बनतात. आणि त्यांच्या मुखाने अभंग जन्म घेतात. त्यांची भक्ती एवढी गाढ की साक्षात पांडुरंग त्यांच्या बायकोचे बाळंतपण काढायला येतो, त्यांच्यासाठी गुरे हाकतो. पण तरीही कष्ट, अवहेलना चुकत नाहीत. पंढरपुरच्या वाळवंटात भक्तीरसात बुडालेल्या चोखोबांना गावात भिंत बांधण्यासाठी जबरदस्तीने आणले जाते. ती भिंत बांधत असताना भिंत कोसळते आणि चोखोबा ढिगाऱ्याखाली गाडले जातात.
सिनेमातला शेवटचा प्रसंग पाहताना बघणारा आतून हेलावल्याशिवाय रहात नाही. त्या ढिगाऱ्याखाली असलेली चोखोबांची हाडे गोळा करायला नामदेव महाराज येतात. ते प्रत्येक हाड उचलून कानापाशी नेतात. चोखोबांच्या प्रत्येक हाडातून ‘विठ्ठल विठ्ठल’ हा ध्वनि येत असतो.
मी बाबांना विचारले, “चोखोबांच्या हाडांतून खरंच ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत असेल का?”
“जो समाज महारांना स्पर्श करण्याच्या योग्यतेचे देखील समजत नाही, त्यांना प्राण्यांपेक्षाही कमी दर्जाचे मानतो आणि वागवतो, तो समाज चोखोबांना फुकाफुकी मोठेपण देईल असे वाटते का तुला? त्यांना संतत्व देणाऱ्या गोष्टी अशा समाजात उगीचच कुणी रचेल का? एका महाराच्या नावावर कोणी अशी प्रासादिक अभंग रचना करून ठेवेल का?
चमत्कार हा नाही की चोखोबांची हाडे ‘विठ्ठल’ उच्चारात होती, चमत्कार हा आहे की जातीय विषमतेने आणि अस्पृश्यतेने बरबटलेल्या समाजात गेली तब्बल सातशे वर्षे लिखापडी न शिकलेल्या एका अस्पृश्य शेतमजूराची अभंग रचना श्रद्धापूर्वक गायली जात आहे! हा भक्तीचा महिमा आहे, ‘हृदय बंदीखाना करून, त्यात विठ्ठल कोंडणार्या’ भक्तीचा महिमा आहे. त्याला शास्त्राने तोलता येणार नाही!” बाबा म्हणाले.

Zagraj W Darmowe Sloty Sloty Mobilne Na Slotman Polska

mobilne sloty online

RTP to procent środków, jaki slot zwraca graczom w dłuższej perspektywie. Najlepsze automaty mobilne łączą kilka ważnych cech. Według analiz rynku gier kasynowych z 2024 roku, ponad 65% sesji gry odbywa się już na urządzeniach mobilnych. Grać możesz wszędzie tam, gdzie masz zasięg internetu – w domu, w kolejce czy podczas przerwy w pracy. Dzisiejsze automaty mobilne wyglądają i działają tak samo dobrze jak ich odpowiedniki na komputery stacjonarne.

W praktyce oznacza to dostęp do stabilnych, znanych tytułów i funkcji, od klasycznych automatów po nowoczesne produkcje ze złożonymi bonusami. Dla slotów z wysoką zmiennością warto rozważyć test w małej sesji na minimalnych stawkach. W momencie opracowania materiału brak stałych bonusów bez depozytu. Ustawienia są dostępne w profilu i warto je aktywować od pierwszego dnia. System wyloguje Cię automatycznie po upływie wyznaczonego czasu. Ustaw dzienny, tygodniowy lub miesięczny limit, a system automatycznie zatrzyma grę po jego osiągnięciu.

Brak aplikacji do pobrania nie przeszkadza mi zupełnie w grze mobilnej, która możliwa jest za pomocą responsywnej strony kasyna. Wśród dostępnych opcji znajdziesz Paysafecard, Skrill, Neteller, Visa, Mastercard oraz waluty krypto, np. Udało mi się potwierdzić, że wszystkie płatności są obsługiwane również mobilnie, a wypłaty krypto realizowane są natychmiastowo już od 20 zł. Moje rekomendacje sprawdzają Skolim Kasyno się przede wszystkim jako najlepsze kasyna mobilne w Polsce. Mobilne kasyna online pozwalają na wygodną grę z poziomu telefonu lub tabletu. To ogólne określenie Twoich dostępnych środków, które mogą być podzielone na kategorie „Prawdziwe pieniądze” i „Pieniądze bonusowe”.

बाबा, तुम्हाला रामकृष्ण परमहंसच का आवडतात…?

डॉ. रुपेश पाटकर : मला जेव्हापासून आठवते तेव्हापासून मी रामकृष्ण परमहंसांविषयी बाबांकडून ऐकत आलो आहे. कदाचित मला काही कळायच्या आधीपासून रामकृष्ण परमहंसांची मूर्ती पाहत आलोय. थोडा मोठा झाल्यावर आणि इतर संतांची माहिती झाल्यावर मला हा प्रश्न पडू लागला की अनेक मराठी संत असताना, विठ्ठलासारखे दैवत मराठी मुलखात असताना बाबा बंगालमधील रामकृष्ण परमहंसांकडे का आकर्षित झाले असावेत. मला आठवते आम्ही गावातील घरातून बागेतल्या घरात नुकतेच रहायला गेलो तेव्हा हा प्रश्न बाबांना मी विचारला. जी एक गोष्ट आमच्या सामाईक घरातून बाबा फार जपून घेऊन आले, ती म्हणजे रामकृष्ण परमहंसांची मूर्ती. या घटनेला आज चाळीसपेक्षा जास्त वर्षे होऊन गेलीत. पण आजही मला बैलांच्या गाडीतून दीड फुट उंचीची रामकृष्णांची मूर्ती घेऊन बसलेले बाबा आठवतात. मी जेव्हा त्यांना रामकृष्णच का आवडतात असं विचारलं, तेव्हा ते काही क्षण गप्प राहिले. जणू त्यांना देखील त्याचं कारण ठाऊक नसावं. काही क्षणानंतर ते म्हणाले, “गीतेच्या चौदाव्या अध्यायात भगवान म्हणतात, तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेले मुनी माझेच रूप होतात. त्यांना ओळखायचे कसे, हे सांगताना भगवान म्हणतात,
आत्मत्वे सम जो पाहे सोने पाषाण मृत्तिका
धैर्यवंत सुखे दु:खे स्तुति निंदा प्रियाप्रिय!!
सोने, दगड आणि माती खरोखरच ज्यांना एक वाटत होती असा अलीकडच्या काळातील अवतार म्हणजे रामकृष्ण परमहंस. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यत सर्व संत मंडळी अशीच होती. संत मीराबाईपासून संत कबीरांपर्यंतची मंडळीदेखील अशीच होती.
पण तरीही मी रामकृष्णांकडे का ओढला गेलो, ते नाही सांगता येणार. कदाचित रामकृष्ण अगदी अलिकडचे असल्यामुळे असेल, त्यांच्याविषयी निर्विवाद माहीती उपलब्ध असल्यामुळे असेल. पण हे मात्र नक्की की त्यांना सोने आणि माती एकच वाटे. मनाची अशी तयारी आणि त्या मानसिक तयारीचे त्यांच्या वागणुकीत प्रतिबिंब दिसणे, मला त्यांच्यातले देवत्व दाखवत होते. रामकृष्णांचे फोटो तू पाहीलेस. त्यांनी कधी वेगळा पेहराव केलाय असे दिसते का? साधे धोतर हेच त्यांचे नेहमीचे कपडे. गळ्यात माळा नाही, डोक्याला टिळा नाही, डोक्यावर टोपी- पगडी वगैरे काही नाही. नियमित दाढी न करणाऱ्याची वाढते तितकी दाढी. आपण आध्यात्मिक आहोत याचे अवडंबर दाखवणारे एकही चिन्ह नाही. आणि हे त्यांच्या विचारांना अनुसरूनच होते. ते म्हणायचे, ‘मी आणि माझे’ जोपर्यंत आहे, तोपर्यंत आपण देवापासून दूर आहोत, जेव्हा ‘तो (परमेश्वर) आणि त्याचे’ हा भाव होईल, तेव्हा आपण त्याच्या मार्गावर गेलो असे समजायचे.
आपले मीपण, आपला अहंकार पुरता मरावा म्हणून लोकांची विष्ठा असलेली जागा त्यांनी स्वतःच्या हातांनी स्वच्छ केली. समाज ज्यांना अस्पृश्य म्हणतो, त्यांच्या अंगणातील कचरा ते पहाटे उठून साफ करीत.
ते कित्येक वर्षे कलकत्त्यात राहत होते, पण त्यांनी स्वतःसाठी ना कधी जमीन खरेदी केली, ना घर घेतले. त्यांचे बालपण कामारपुकूर या खेड्यातील झोपडीत गेले तर कलकत्त्यातील वास्तव्य दक्षिणेश्वरच्या काली मंदीराच्या पडवीतील खोलीत.”
बाबा त्यांच्या संध्याकाळच्या ध्यानानंतर ‘मास्तर महाशय’ या रामकृष्णांच्या अनुयायांनी लिहिलेले वचनामृत वाचून दाखवित. हे वचनामृत म्हणजे रामकृष्ण आणि त्यांचे शिष्य यांच्यातील संवाद आहेत. त्यांचे वर्णन मास्तर महाशय यांनी इतके उत्कृष्ट केले आहे की ते ऐकत असताना डोळ्यांसमोर प्रसंग उभे राहात.
एकदा त्यात त्रिगुणांचा उल्लेख आला. सत्व, रज आणि तम. तम म्हणजे आळस. काम टाळण्याची प्रवृत्ती. त्यावर माझा प्रश्न होता, ‘आपला सगळा खटाटोप काम टाळण्यासाठीच असतो ना? आताचे काम टाळता आले तर उत्तमच. पण ते बर्‍याचदा शक्य नसते म्हणून मग आता आपण असे काही करू पाहतो की आपले पुढचे काम टळेल. शिकायचे कशाला? शारीरिक काम टाळायलाच ना?”
बाबा म्हणाले, “तू चुकीचा अर्थ घेतलास. मी तुला डॉक्टर व्हायला सांगतोय, ते तू मजेत आयुष्य काढावे म्हणून नव्हे. तुझ्याकडून अधिक कुशल काम व्हावे म्हणून. जेणेकरून समाजपुरुषाची तू अधिक चांगली सेवा करू शकशील म्हणून. पैसेच मिळवण्यासाठी तुला सांगायचे असते तर तुला व्यापारी हो म्हटले नसते का?
हे देखील लक्षात घे की सतत कुठले ना कुठले काम करत राहणे हा कर्मयोग नव्हे. ते रजोगुण वाढल्याचे लक्षण असू शकते. काहीच न करणे म्हणजे तमोगुण. फळाच्या अपेक्षेने काम करणे म्हणजे रजोगुण. माझ्यासकट बहुतेक सर्वजण रजोगुणी असतात. फळ परमेश्वराला अर्पण करणे म्हणजे सत्वगुण. तमोगुण आणि रजोगुण यांच्यापेक्षा सत्वगुण चांगला. गीतेच्या चौदाव्या अध्यायात भगवान म्हणतात,
सत्वांतूनि निघे ज्ञान निघे लोभ रजांतूनी
अज्ञान मोह दुर्लक्ष निघती हीं तमांतुनी!
रामकृष्ण म्हणतात, सत्वगुणाला देखील सोडून द्यायचे आहे, कारण त्याचेदेखील बंधन असते. गीतेत भगवान म्हणतात,
मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला ही चि लेववी!”
” सत्वगुण देखील सोडायचा, हे कसे? मला नाही कळले,” मी म्हणालो.
त्यावर बाबा म्हणाले, “संत नामदेवांना बालपणापासून विठ्ठल दिसे. त्यांची भक्ती अशी की साक्षात भगवंत त्यांचा नैवेद्य जेवी. लाखो जन्मांच्या तपस्येने योग्यांना जे शक्य होत नाही, ते सगुण दर्शन त्यांना सहज होते आहे याचा त्यांना अभिमान वाटे. हा सात्विकतेचा अभिमान. हा अभिमान मुक्ताईच्या लक्षात आला. पंढरपुरात संतमेळा जमला असताना ती गोरोबा काकांना म्हणाली, ‘काका, मडक्यांची पारख करण्यात तुम्ही निष्णात. आमची मडकी कच्ची की पक्की ते एकदा सांगा ना तपासून.’ मग गोरोबा काकांनी मडकी तपासण्याचं थापटणे घेतले आणि एकेकाच्या डोक्यावर मारू लागले. ज्ञानोबांच्या डोक्यावर मारून म्हणाले, ‘हे पक्के!’ मग निवृत्तीनाथ, मग सोपानदादा, मग मुक्ताई. सगळ्यांची मडकी ‘पक्की’ म्हणत ते नामदेवांपाशी पोचले. त्यांच्याही डोक्यावर त्यांनी थापटणे मारले आणि म्हणाले, ‘कच्चे!’ सहाजिकच नामदेवाना राग आला. ते आपले गार्‍हाणे मांडायला विठ्ठलाच्या पुढ्यात गेले. पण त्यांची बाजू न घेता विठ्ठल म्हणाला, ‘तुला गुरूकृपेची आवश्यकता आहे. औंढ्या नागनाथ क्षेत्री जा. तिथे विसोबा खेचर म्हणून व्यक्ती आहे. तो तुला गुरूपदेश देईल.’ साक्षात विठ्ठलानेच सांगितले म्हटल्यावर नामदेवांपुढे गुरू शोधण्याशिवाय पर्याय उरला नाही. नामदेव औंढ्या नागनाथला गेले. त्यांनी विसोबा खेचरांचा शोध घेतला. ते एका छोट्याशा देवळात असल्याचे त्यांना कळले. ते तिथे पोचले. बघतात तर कधी स्वप्नातही न ऐकलेलं दृश्य. एक जख्खड म्हातारा त्या देवळातल्या पिंडीवर पाय ठेवून निजलाय. ज्याला साधा पाय कुठे ठेवायचा याचा विधिनिषेध नाही, तो मला उपदेश कसला करणार. काहीतरी चुकले असावे. आपण चुकीच्या माणसाकडे पोचलो असावे, असा विचार त्यांच्या मनात डोकावून गेला. ते त्या म्हातार्‍याला म्हणाले, ‘आजोबा, तुमचा पाय देवाच्या पिंडीवर आहे. बाजूला करा तो.’ त्यावर तो म्हातारा म्हणाला, ‘पोरा, मी खूप थकलो आहे. माझ्या अंगात जरा सुद्धा त्राण उरले नाही. तूच जरा माझा पाय ‘देव नसलेल्या ठिकाणी’ ठेवतोस का?’ नामदेवांनी त्याचा पाय बाजूला केला. तर काय आश्चर्य. त्यांनी जिथे तो ठेवला तिथे पिंडी दिसू लागली. नामदेवांनी तिथून पाय हलवून जरा बाजूला ठेवला तर तिथे देखील पिंडी दिसू लागली. नामदेवांनी त्या म्हातार्‍याकडे पाहिले. तो म्हातारा म्हणाला, ‘देव नाही अशी कुठे जागा आहे का?’
बस. नामदेवांना सर्वत्र घनदाट भरलेला विठ्ठल दिसू लागला. आता त्यांचा विठ्ठल फक्त पंढरपुरातील गाभाऱ्यात नव्हता, तो सर्वत्र होता. तो आता निराकार होता. निर्गुण होता. आता नामदेव सुद्धा नामदेव नव्हते, ते देखील विठ्ठल झाले होते!
अशा अवस्थेचे वर्णन गीतेच्या चौदाव्या अध्यायात करताना भगवान म्हणतात,
गुणाविण नसे कर्ता आत्मा तो त्यापलिकडे
देखणा ओळखे हे जो होय माझे चि रूप तो!!

ज्ञान….!

डॉ. रुपेश पाटकर
……..
शाळेत असताना निबंध लेखन हा एक विषय असे. अगदी दुसरीत असल्यापासून निबंध लिहिणे सुरू होई. दुसरी व तिसरीत हे फार सोपे असे. कारण निबंध लिहिणे म्हणजे माहिती लिहिणे असे. गाईवर निबंध असेल तर गाईला पाय किती, शिंगे किती, शेपट्या किती, रंग कोणते वगैरे प्रश्नांची उत्तरे लिहिली की झाला निबंध तयार. चौथीपासून मात्र या वर्णनापेक्षा अधिक अपेक्षित असे. पण ते नक्की काय, हे मात्र समजत नसे म्हणा किंवा सुचत नसे म्हणा. चौथीत असताना आमच्या मुख्याध्यापकांनी मुलांसाठी असलेल्या एका मासिकातील एका विद्यार्थीनीची रोजनिशी वाचून दाखवली होती. तिने खूप आकर्षक पद्धतीने लिहिले होते. मला तिचा हेवा वाटला. आपला निबंध तिच्यासारखा कसा होईल, याचा विचार करत असताना आमच्या गुरुजींनी सल्ला दिला की निबंधात मोठ्या नेत्यांचे सुविचार मांडले तर निबंध आकर्षक होतो. त्याप्रमाणे मी सुविचारांचे पुस्तक आणून वाचू लागलो. त्यात स्वामी विवेकानंदांचे काही सुविचार होते. मला ते खूप वेगळे वाटले. म्हणजे मला ते धार्मिक वाटले नाहीत. मला अजूनही ते सुविचार आठवतात. एक सुविचार होता, ‘जुना धर्म सांगतो ज्याचा देवावर विश्वास नाही तो नास्तिक, नवा धर्म सांगतो ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक!’ दुसरा सुविचार होता, ‘सर्व शक्ती तुमच्यातच विराजमान आहे, तुम्हाला काहीही अशक्य नाही!’ तिसरा सुविचार होता, ‘मी नव्हे, तू!’ चौथा सुविचार होता, ‘मी त्या परमेश्वराचा सेवक आहे, ज्याला अज्ञानी लोक ‘मनुष्य’ म्हणतात!’ ही वाक्ये मला धार्मिक वाटत नव्हती. मला ती बरीचशी प्रोत्साहन देण्यासाठी बोलतात तशी वाटत होती.
“म्हणजे विवेकानंद काय म्हणत होते?” मी बाबांना विचारले.
“ही वाक्ये धार्मिक वाक्येच आहेत. ती स्वामीजींच्या ज्या लेखांतून घेतली आहेत, ते लेख तू वाचलेस तर तुझ्या लक्षात येईल,” बाबा म्हणाले. पण मी ती वाक्ये कोणत्या लेखातील आहेत हे शोधावे कसे हा माझ्यापुढ्यातला प्रश्न होता. मी शाळेत शिकत असल्याचा काळ आजच्यासारखा ‘गूगल सर्च’चा काळ नव्हता. आणि भाषा विषयातील निबंधासाठी ते शोधण्याचा उत्साह माझ्यात दीर्घकाळ राहणार नाही, हे देखील बाबांना ठाऊक होते. म्हणून तेच म्हणाले, “गीतेच्या तेराव्या अध्यायात भगवान म्हणतात,
अर्जुना या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते!
जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्रज्ञ म्हणती तसे!!
या श्लोकाचा अर्थ तुला कळला तर स्वामीजी काय सांगतात ते कळेल.”
मला या श्लोकात न समजण्यासारखे काही वाटले नाही. देह म्हणजे क्षेत्र आणि आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ. पण हे माहीत असूनदेखील मला त्याचा आणि स्वामीजींच्या सुविचारांचा संबंध लक्षात येईना.
बाबा म्हणाले, “आपण जेव्हा ‘मी’ असे म्हणतो तेव्हा कशाबद्दल म्हणत असतो?”
“माझे शरीर आणि माझे मन!”
“पण तेराव्या अध्यायात भगवान जे सांगत आहेत ते वेगळे आहे. ते समजण्यासाठी तुला थोडा विचार करावा लागेल. आपल्यासमोर टेबल आहे. तुला ते दिसतेय. कशामुळे दिसतेय?”
“डोळ्यांमुळे!”
“डोळे हे बघण्याचे इंद्रिय आहे. डोळ्यांना फक्त टेबलच दिसतेय का?”
“नाही. अनेक गोष्टी दिसत आहेत.”
“बघणारे इंद्रिय एक, पण त्याला दिसणार्‍या गोष्टी अनेक. बघणारे इंद्रिय स्थिर, पण दिसणार्‍या गोष्टी वेगवेगळया. आणखी एक फरक. बघणारे डोळे आणि दिसणारे दृश्य हे एकच नाहीत. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यालाच दृकदृश्य विवेक म्हणतात.
बघणारे डोळे स्वतःला पाहू शकत नाहीत. पण समोर येणार्‍या प्रत्येक गोष्टीला पाहतात. हीच गोष्ट कानांची आणि आवाजांची. हीच गोष्ट त्वचा आणि स्पर्शाची.
आता मला सांग, तुझ्या डोळ्यांना काय दिसतेय ते तुझ्या मनाला कळते की नाही?”
“हो!”
“म्हणजे मन बघणारे आणि डोळे दिसणारे. बघणारे मन आणि त्याला जाणवणारे डोळे एकच आहेत का?”
“नाही.”
“आता मला सांग, तुझ्या मनात काय चाललेय, त्यात कोणते विचार येत आहेत, कोणत्या भावना येत आहेत, हे कळते ना?”
“हो!”
“मनात काय चाललेय हे ज्याला कळतेय, ते मनापासून भिन्न असणार. बरोबर ना?”
“हो!”
“बाहेर काय चाललेय ते डोळे, कान वगैरे इंद्रियांना कळते. इंद्रियांत काय चाललेय ते मनाला कळते. मनात काय चाललेय ते ज्याला कळते, तो खरा मी! तो मी म्हणजे जीवंतपणा.”
“पण बाबा, इतकी डोकेदुखी करणारा विचार कराच कशाला?”
“कारण हा विचार आपल्याला निर्भय बनवतो. मी म्हणजे शरीर नव्हे, मी म्हणजे मन नव्हे, हे कळले की शरीराचा त्रास किंवा मनाचा त्रास म्हणजे माझा त्रास नव्हे, हे लक्षात येते. हे मनात पक्के रुजले की शरीराला किंवा मनाला होणार्‍या त्रासाची भीती वाटत नाही. वेदना होणे (Pain) आणि त्रास भोगणे (Suffering) यात फरक आहे.”
“कसा?”
“जशा बाहेरच्या गोष्टी आणि इंद्रिये या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या एक नाहीत. तसेच इंद्रियांना जाणणारे मन आणि ती इंद्रिये या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या एक नाहीत. तसेच मनात काय चाललेय ते ज्याला कळते तो जीवंतपणा आणि मन या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बाहेरच्या गोष्टी जसे पुस्तक, घड्याळ या माझ्या गोष्टी आहेत पण पुस्तक, घड्याळ म्हणजे मी नव्हे. तसेच शरीर, मन या माझ्या गोष्टी आहेत पण त्या म्हणजे मी नव्हे.
मी म्हणजे जीवंतपणा. जीवंतपणा म्हणजे आत्मा! म्हणजेच क्षेत्रज्ञ. हे लक्षात यायच्या आधी माणसाला वेदना (Pain) आणि त्या वेदनेचा मानसिक त्रास (Suffering) होत असतो. पण एकदा हे ज्ञान झाले की क्षेत्र (शरीर व मन) आणि क्षेत्रज्ञ यात भेद आहे, मग माणसाला वेदना जाणवेल पण मानसिक त्रास (Suffering) होणार नाही.
गीतेच्या तेराव्या अध्यायात आणखी एक मुद्दा भगवान सांगतात,
क्षेत्रज्ञ मी चि तो जाण क्षेत्रात सगळ्या वसे!
क्षेत्र क्षेत्रज्ञ भेदास जाणणे ज्ञान मी म्हणे!!
म्हणजे प्रत्येक शरीरातील जीवंतपणा म्हणजे भगवान स्वतः आहेत, असे भगवानच निःसंदिग्धपणे सांगतात. माझ्यातला जीवंतपणा म्हणजे परमेश्वर असेल तर ती अनंत शक्तीच माझ्यात वसत आहे. स्वामीजी जेव्हा म्हणतात की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक म्हणजे स्वतःत असलेल्या जीवंतपणावर विश्वास नाही तो नास्तिक. जेव्हा स्वामीजी तुमच्यातच सर्व शक्ती विराजमान आहे असे म्हणतात तेव्हा त्यांना या जीवंतपणातील शक्तीविषयी म्हणायचे असते. स्वामीजी माणसामध्ये दडलेल्या जीवंतपणाला म्हणजेच परमेश्वराला ओळखून त्याची सेवा करा म्हणतात.”
हे ऐकत असताना मला एक प्रश्न पडला की जर प्रत्येकातील जीवंतपणा म्हणजे देव असेल तर दुष्ट लोकातील जीवंतपणा म्हणजे देखील परमेश्वर असेल का?
“होय. कौरवही तोच आणि पांडवही तोच. तुला ताटीच्या अभंगांची गोष्ट सांगतो, म्हणजे लक्षात येईल. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना संन्याश्याची पोरे म्हणून गावातल्या पुरोहितांनी वाळीत टाकले होते. या मुलांचा विटाळ मनाला जाई. त्यांच्या आईवडिलांना पुरोहितांनी मरायला लावले होते. त्यामुळे दुःख झाले तर कुशीत शिरून रडायला आईवडील देखील नव्हते. त्यांच्याशी गावातल्या मुलांनी खेळायला वगैरे येणे दूरच राहिले, आईवडीलाविना पोरक्या झालेल्या त्या मुलांना गावात भिक्षा मागायला गेले तरी टोचून बोलणे ऐकावे लागे. कोणी त्यांना मिळालेली भिक्षा हिसकावून घेऊन धुळीत मिसळत. कोणी त्यांच्या हातातले मातीचे भांडे फोडून टाकत. जिथे गाव पाणी भरी त्या इंद्रायणीच्या घाटावर त्यांना येऊ देत नसत. एक दिवस कोणी पुरोहित ज्ञानेश्वरांना खूपच तुच्छतेने बोलला. ते त्यांच्या जिव्हारी लागले.
तू स्वतःला ज्ञानोबांच्या जागी ठेवून विचार करून बघ म्हणजे त्यांना किती त्रास झाला असेल ते लक्षात येईल.
लोकांनी त्यांना आणि त्यांच्या भावंडाना चांगलं वागवण्याची काहीच आशा दिसेना. पुरती घुसमट झाली त्यांची त्या दिवशी. आणि पुन्हा या दुष्ट जगाचं तोंड बघायच नाही, अशा विचाराने त्यांनी झोपडीच दार (ताटी) लावून घेतले. त्यावेळी त्यांना त्यांच्या धाकट्या बहिणीने मुक्ताईने समजावले. हे समजावताना तिने हाच मुद्दा मांडला. ती म्हणाली, ‘जे त्रास देणारे आहेत, ते कोण आहेत? एक परमेश्वरच अनेक रूपे घेऊन वावरत आहे ना.’
एकापासूनि अनेक झाले! त्यासि पाहिजे सांभाळिले!!
त्या पुढे म्हणतात, ज्यानी तुला त्रास दिला त्यांच्यात तोच परमेश्वर आहे ना, जो तुझ्यात आहे. त्यांनी तुला वाईट बोलणे म्हणजे आपणच आपणास बोलण्यासारखे आहे.
हात आपुला आपणा लागे! त्याचा करू नये खेद!
जीभ दातांनी चाविली! कोणे बत्तीशी तोडीली!!
ऐसे कळले उत्तम! जन तेचि जनार्दन!!”
“मग त्रास देणार्‍यांना काहीच करायचे नाही का?” मी विचारले.
“रामकृष्ण परमहंसांनी याचे उत्तर एका गोष्टीने दिलेय. एका माळरानावर एक विषारी साप राहत होता. तो त्याच्या आसपास येणार्‍या माणसांना, प्राण्यांना चावे. त्याच्या दंशाने अनेक माणसे, प्राणी मेले होते.
त्यामुळे त्याच्या जवळपास कोणी जात नसे. त्याची त्या गावावर दहशत पसरली होती.
एक दिवस त्या गावात एक साधू आला. त्या साधूला गावकर्‍यांनी विषारी सापाची समस्या सांगितली. साधूला साप नियंत्रणात आणण्याचा मंत्र ठाऊक होता. त्या मंत्रामुळे साप साधूच्या नियंत्रणात आला. साधूने त्याला ‘लोकांना न चावण्याचा उपदेश’ केला. त्या दिवसापासून साप कोणालाच चावत नसे. साप चावत नाही असे हळूहळू गावकर्‍यांच्या लक्षात आले. त्यांना सापाच्या जवळ जाण्याची धिटाई आली. आता लोकच त्या निरुपद्रवी झालेल्या सापाला दगड मारून त्रास देऊ लागले. त्यामुळे सापाने बिळाच्या बाहेर जाणे बंद केले. त्याची उपासमार होऊ लागली. तो रोडावत गेला. वर्षभराने तो साधू पुन्हा त्या गावात आला. त्या सापाला शोधत शोधत तो सापाच्या बिळापाशी आला. रोडावलेला साप बघून काय घडले, ते त्याला कळले. तो सापाला म्हणाला, ‘तुला मी कोणाला चावू नको म्हणून सांगितले होते, त्यांना भीती घालू नको असे सांगितले नव्हते. त्यांनी तुला त्रास दिला तेव्हा तू त्यांच्यावर फुसकारायला हवे होते. सर्वात परमेश्वर आहे, हे जाणून कोणालाच त्रास देऊ नये, पण दुसर्‍याने त्रास दिला तर त्रास देणार्‍याने आपल्यापासून दूर रहावे हे बघायला हवे. त्रास देणार्‍याला फुसsss करावे, पण चावू नये!”
…….
डॉ. रुपेश पाटकर

कुणकेश्वर मंदिरात तब्बल ११, १११ आंब्यांची आरास…!

देवगड : श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट वतीने आज दि ११ मे रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन कुणकेश्वर येथे करण्यात आले होते. या आंबा महोत्सव निमित्ताने श्री देव कुणकेश्वर मंदिरात ११,१११आंब्यांची आरास करण्यात आली आहे . श्री देव कुणकेश्वराच्या शिवलिंगाभोवती गाभाऱ्यात देवगड हापूसची आरास करून सजावट केलेली आहे. त्याचबरोबर मंदिरातील बाहेरील नंदीगाभाऱ्यात देखील देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली.

देवगड हापूस आंब्याच्या आरासी मुळे श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसरात देवगड हापूसचा सुगंध दरवळत होता. मन प्रसन्न वाटत आहे. दरवर्षी ११ मेला श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षीही कुणकेश्वर मिठमुंबरी येथील आंबा बागायतदाराने आपल्या बागेत पिकवलेल्या हापूस आंबा श्री देव कुणकेश्वर मंदिरात आणून देतात.

आंबा वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात | पत्नी जागीच ठार, पती गंभीर

देवगड : देवगड तारामुंबरी येथील सुमित खवळे व पत्नी स्पृहा खवळे हे खवळे दापत्य देवगड होऊन महिंद्रा पिकअप टेम्पो मधून आंबे घेऊन मुंबईला जात होते. मुंबईला जात असताना मुंबई गोवा महामार्गावर पेन तालुक्यातील हमरापुर फाटा हद्दीत गॅस सिलेंडर वाहून नेणारा (MH १२ EQ २२०८) या गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकला महिंद्रा बोलेरो पिकअप(MH ०७ AJ २६८२) ची जोरदार पाठीमागून धडक बसून अपघात झाला.हा अपघात पहाटे ४.१५ सुमारास झाला.

या अपघातात बोलोरो पिकअप मधून प्रवास करणाऱ्या सुमित चंद्रकांत खवळे वय 28 राहणार देवगड तारामुंबरी हे गंभीर जखमी झाले. आहेत तर त्यांची पत्नी स्पृहा सुमित खवळे वय 24 ही जागीच ठार झाली. गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकला बोलेरो पिकअप ची पाठीमागून इतक्या जोराने धडक बसली की बोलेरोच्या समोरील भाग ट्रक च्या मागील बाजूने आत घुसल्याने बोलेरो मधील पती-पत्नी हे दापत्य आत अडकुन पडले. यात सुमित खवळे गंभीर जखमी झाले . तर त्यांची पत्नी दोन्ही वाहनांमध्ये चिरडल्याने जागीच ठार झाल्या आहेत. अपघाताचे वृत्त कळताच कल्पेश ठाकूर हे देवदूत बनवून आले व त्यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ पेन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, महामार्गावर अपघातस्थळी दोन्ही वाहने एकमेकामध्ये अडकून पडल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती.मात्र दादर सागरी पोलीस व पेन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त वाहनांना महामार्गावरून बाजूला करून मुंबई गोवा मार्ग वाहतुकीस सुरळीत केला.

लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पो अपघात…!

कणकवली : वागदे येथील हॉटेल वक्रतुंड समोर बोलेरो पिकपने लग्नाचे वऱ्हाड घेऊन देवगडच्या दिशेने जाणारा बोलेरो पिकप टेम्पो पलटी होत भीषण अपघात झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात जवळपास २५ पेक्षा अधिकजण जखमी झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

देवगड पाडगावच्या दिशेने जाणारे हे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात असताना पिकप चालकाने डिव्हायडरवर पिकप गाडी चढवल्याने महामार्गावर पिकप टेम्पो पलटी झाला. यात अनेकांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली असून घटनेची माहिती मिळताच महामार्गावरून जाणाऱ्या राजा पाटकर यांच्यासह वागदे सरपंच संदीप सावंत, यांनी जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

सुपातले जात्यात जाणार हाय रे…| इतिहास कधी खोटं बोलणार नाय रे

भगवान शेलटे :

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है…!
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है…!

सध्या रिफायनरीच्या विरोधात कोकण तापलय. कोकणच्या लाल मातीला आपल्या आईसारखं जपणाऱ्या कोकणातल्या बारसु सोलगावच्या आया बहिणी तळपत्या उन्हात आज आपल्या जमिनीला घट्ट छातीशी धरून आहेत. या लाल मातीचा लिलाव करणाऱ्या दलालांना आणि राजकारण्यांना त्या टाहो फोडून सांगत आहेत, पैशांसाठी आमच्या आईची विक्री करणाऱ्या आमच्या औलादी नाहीत. ज्या मातीनं आमच्या कित्येक पिढ्या पोसल्या ती आई आज संकटात असताना, तिला मिळवण्यासाठी गिधाड तुटूण पडली असताना तिच रक्षण करण हे आमचं कर्तव्य आहे आमचा धर्म आहे.

निसर्गाने भरभरून दिलेल्या कोकणाला आज विकासाच्या नावाखाली ओरबाडून खाल्ल जात आहे. कोकणी माणूस ओरडून ओरडून सांगत आहे , बाबानो आमच्या जमिनी घेऊन, इथला निसर्ग नासवून आम्हाला रोजगार नको तुमचा. सुखा समाधानाने दोन वेळचं अन्न देईल इतकी ताकद इथल्या निसर्गात आहे. कोकणी माणसाने उपासमारीने, किंवा कर्जबाजारी होऊन कधी आत्महत्या केल्याच पाहिलं नाही. जे आहे त्यात समाधानी आणि आरोग्यदाई आयुष्य जगणाऱ्या कोकणी माणसाची झोप आज राज्यकर्ते उडवत आहेत.

‘ग्रीन रिफायनरी’च्या गोंडस नावाखाली एका सौदीच्या कंपनीला हि जागा देण्यासाठी राजकारणी आणि प्रशासन हट्टाला पेटलय. हे सामान्यांचं सरकार म्हणणाऱ्यानी, संघर्ष करणाऱ्या आया बहिणींना हुसकावून लावण्यासाठी २ हजार पोलीसांची कुमक तैनात केलीय. सरकार नेमक कोणाचं गरिबांचं कि भांवडलदारांचं हा प्रश्न सारखा डोळ्यासमोर उभा राहतोय. इंग्रजांची राजवट असल्यारखी परीस्थिती आता बारसू – सोलगावमध्ये सध्या दिसत आहे.

जमिनी ताब्यात घेण्यासाठी, आंदोलन फोडण्यासाठी, लोकांना, आंदोलनाच नेतृत्व करणाऱ्यांना त्रास देण्यासाठी सगळ्या यंत्रणा कामाला लागल्याचं चित्र आहे. जमिनीचे दलाल मुजोर होत चालले आहेत. कंपनी त्यांच्यावर लाखो रुपये उधळत असल्याचं दिसतंय. यातूनच शशिकांत वारीसे सारख्या सच्या, निर्भीड पत्रकाराचा खूनहि झाल्याचं दिसून येतय. ऐन्राॅनच्या वेळी अमेरिकेत ऑडीटनंतर एका अधिकाऱ्यांला म्हणे विचारलं होत, कि एवढा पैसा खर्च कसा झाला…? तर त्याच उत्तर बोलक होत. इथल्या राजकारण्यांना शिकवण्यासाठी हा पैसा खर्च करावा लागला. इथही इथल्या राजकारण्यांना आणि दलालांना शिकवण्यासाठी मोठा खर्च झालेला दिसून येतो.
अशा प्रकल्पांना विरोध करून आपल्याला गावाला जपलच पाहिजे. कारण जेव्हा मुंबईत गिरणी संपात गिरणी कामगार देशोधडीला लागला तेव्हा त्याला गावाने, गावच्या शेतीने आधार दिला…ज्यांचं गाव नव्हतं, शेती नव्हती अशां कामगारांनी आपलं जीवन संपवलं होत. इतिहास याला साक्ष आहे.
गाव, जमीन यांच्याशी या राजकारण्यांना काहीही देणघेण नाही. उद्या गाव उध्वस्त झाल्यास हे शहरात नाही तर विदेशात राहायला जातील. मात्र, कोकणातील सामान्य माणसाला त्यावेळी रस्त्यावर याव लागेल. हा धोका कोकणी माणसाने आत्ताच ओळखला पाहिजे.
हे आंदोलन सुरु असताना अनेक बुद्धीजीवी, प्राणीप्रेमी, पक्षीप्रेमी, सोशल मिडीयावर कोकणच्या जीवावर पैसे कमवणारे, मिरवणारे एक चक्कार शब्द काढत नाहीत हे आपलं दुर्दैव आहे. अशा कातडी बचाव लोकांच्या जीवावर कोकण कधीच नव्हत हे हि तेव्हडचं खर

कोकणाला संघर्ष काही नवा नाही. कोकणासाठी संघर्ष करणाऱ्या त्या शेतकरी, आय बहिणी रणरागिणी, इथल्या मातीवर प्रेम करणारा तरुण कोकणच रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. रिलायन्स पाईप लाईन, कळणे मायनिंग, रायगड सेझ, जैतापूर अणुउर्जा प्रकल्प अशा अनेक विनाशकारी प्रकल्पांना कोकणातल्या निर्भीड लोकांनी प्राणपणाने विरोध केलाय. तेवढ्याचं ताकतीने रिफायनरीचं संकट सुद्धा परतवून लावू यात शंका नाही.
खरतर निसर्गाने भरभरून दिलेल्या कोकणात इथल्या उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे लघु उद्योग न आणता कोकण भकास करणारे प्रकल्प राजकारणी आपल्या माथी का मारत आहेत हेच कळत नाही. पैशांचा हव्यास एक दिवस कोकणचं अस्तित्वच नाहीस करेल हे त्यांना कोण सांगणार…?
आज खऱ्या अर्थाने बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते यांची आठवण येते. आज कोकणचं रक्षण करण्यासाठी जो संघर्ष सुरु आहे, त्यांनी अशी वेळच येऊ दिली नसती. कारण, हे राजकारणी इथल्या लोकांसाठी काम करत होते, कुठल्या भांडवलदार कंपनीसाठी नाही. त्यांनी अभ्यास करून पहील्यांदाच अशा विनाशकारी प्रकल्पांना विरोध केला असता हे हि तेवढच खर आहे.

शेवटी जाताजाता एक सांगावस वाटत आज बारसू सोलगाव वाले जात्यात आहेत आणि आम्ही सुपात. त्यामुळे सुपातले जात्यात जायला वेळ लागणार नाही हे सत्य नाकारून चालणार नाही. इथं क्युबाचा महान क्रांति
कारक चे गव्हेराच एक वाक्य आठवत. चे म्हणतो ‘‘ मैने कब्रिस्तान में ऊन लोगोंकी कब्रे देखी है, उन्होने इसलिये संघर्ष नाही किया कि कहि वे मारे नही जाएं..!

भगवान शेलटे

तुम्ही चांगले कसे वागता…?

डॉ. रुपेश पाटकर : चौथीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यानंतर मी पाचवीत हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला ‘मराठी शाळा’ म्हणत तर हायस्कूलला ‘इंग्रजी शाळा’ म्हणत. पण ‘इंग्रजी शाळा’ असे तिला आम्ही म्हणत असलो तरी ती इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती. पाचवीपासून इतर विषयांसोबत इंग्रजी भाषादेखील शिकवणे सुरू होई म्हणून ती इंग्रजी शाळा. पण चौथीपर्यंतच्या शाळेत आणि पाचवीपासूनच्या शाळेत आणखी एक महत्त्वाचा फरक होता, तो म्हणजे आमच्या पाचवीपासूनच्या शाळेत ग्रंथालय होते. आणि दर आठवड्याला एक पुस्तक वाचायला दिले जात असे. त्यातल्या एका पुस्तकासंदर्भ घडलेला किस्सा आठवतो, पण पुस्तकाचे नाव आठवत नाही.

ते पुस्तक मी वाचायला नेले खरे, पण ते मी वाचण्याऐवजी बाबांनीच आधी वाचून काढले. त्यात अनेक गोष्टी होत्या. त्यातील एक गोष्ट होती ती कुरूक्षेत्रावरील एका कुटुंबाची!
बाबा म्हणाले, ‘कृष्णाने आपल्या भक्तांना शिकवण्यासाठी किती वेगवेगळे मार्ग वापरले!’ हे बोलताना बाबांचे डोळे भक्तिभावाने चमकत होते. ते काही क्षण थांबले आणि म्हणाले, “त्याने अर्जुनाच्या निमीत्ताने गीता तर सांगितलीच, शिवाय भक्तांच्या पुढ्यात असंख्य उदाहरणे ठेवली. युधिष्ठिर राजाने जेव्हा राजसूय यज्ञ केला, तेव्हाची गोष्ट आहे. त्या यज्ञाच्यावेळी युधिष्ठिराने सढळ हाताने दानधर्म केला. कितीतरी गोरगरीब लोक जेवून गेले. तो सर्व विधी चालू असताना युधिष्ठिराच्या मनात विचार आला की आपणाइतका दानधर्म कधी कोणी केला नसेल. आपणासारखा असा यज्ञ कधी कोणी केला नसेल. त्याच्या अशा विचार करण्यामुळे त्याच्या मनात गर्वाची भावना निर्माण झाली. गर्व म्हणजे दुसऱ्यांना कमी लेखण्याची भावना. दुसऱ्यांना तुच्छ मानणारी भावना. या राजसूय यज्ञात भगवान कृष्णाने उष्ट्या पत्रावळी उचलण्याचे काम स्विकारले होते. तो जिथे या पत्रावळी नेऊन टाकत होता, तिथे एक विचित्र मुंगूस आल्याचे त्याने युधिष्ठिराला सांगितले. खरकटे टाकलेल्या ठिकाणी लोळणार्या त्या मुंगूसचे अर्धे अंग सोनेरी होते. त्या मुंगूसाला पहायला युधिष्ठिर आणि इतर पांडव गोळा झाले. त्यांना तिथे पाहून ते मुंगूस माणसासारख्या आवाजात म्हणाले, ‘महाराज, इथेदेखील माझ्या पदरी निराशाच पडली!’
आधीच ते मुंगूस माणसाच्या आवाजात बोलतेय म्हणून सगळ्यांना आश्चर्य वाटलेच होते, त्यात हे कसल्या निराशेबाबत बोलतेय याचे सर्वाना कुतूहल वाटले.

‘मी सर्वश्रेष्ठ यज्ञाच्या शोधत आहे. आतापर्यंत मी अनेक यज्ञांना भेटी दिल्यात. शेवटी मोठ्या आशेने मी तुमच्या यज्ञाच्या ठिकाणी आलो. पण तुमचा यज्ञदेखील कुरूक्षेत्रावरील कुटुंबाच्या यज्ञाच्या तोडीचा ठरला नाही.’
त्याने कुरूक्षेत्रावरील यज्ञाचा उल्लेख करताच, युधिष्ठिराला आश्चर्य वाटले. तिथे असा यज्ञ झाला असेल तर त्याविषयी आपण कसे ऐकले नाही, असा त्याला प्रश्न पडला.

‘त्या यज्ञातील उष्ट्यात मी चुकून लोळलो आणि काय आश्चर्य माझं अर्ध अंग सोन्याचं झालं. तेव्हापासून मी प्रत्येक यज्ञाच्या ठिकाणी जाऊन तिथल्या उष्ट्यात लोळतो. पण आजपर्यंत माझं उरलेलं अंग सोन्याचं झालं नाही,’ ते मुंगूस म्हणाले.
असे त्या यज्ञात काय दिव्य होते, ते जाणण्याची सर्वानाच उत्कंठा लागली.

मुंगूस पुढे सांगू लागले, ‘कुरूक्षेत्राच्या परिसरात एकदा दुष्काळ पडला होता. लोक उपासमारीने मरू लागले होते. त्या काळात कुरूक्षेत्रावर एक कुटूंब रहात होते. कित्येक दिवसांपासून ते उपाशी होते. सुदैवाने त्यांना एक दिवस थोडेसे धान्य मिळाले. घरधणीनीने ते दळून त्याचे पिठ केले आणि चार भाकर्‍या केल्या. कुटुंबातले चौघेहीजण भाकरी खायला बसले, इतक्यात त्यांच्या दारावर एक भिकारी आला. एकदम थकून गेलेला, जराजर्जर झालेला भिकारी. घरधन्याने त्याला आपल्या ताटातली भाकरी वाढली. त्याने ती लगेच संपवली. पुन्हा तो आशाळभूत नजरेने पाहू लागला. घरधनीनबाईने आपल्या ताटातली भाकरी देखील त्या भिकाऱ्याला वाढली. ती देखील त्याने लगेच मटकावली. त्याची भूक अजूनही तशीच होती. तेव्हा घरातल्या मोठ्या मुलाने आपली भाकरी देखील त्या भिकाऱ्याला वाढली. लहान मुलाने देखील त्या भिकार्‍याला तृप्त करण्यासाठी आपली भाकरी त्याला दिली. त्या दिवशी ते सगळे कुटुंब उपाशीच झोपले. त्यानंतर त्यांच्या भाग्यात पुन्हा अन्न आले नाही आणि ते चौघेही उपासमारीने मरून गेले. त्या घरात जिथे पिठाचे कण पडले होते, तिथे मी योगायोगाने लोळलो, त्याने माझे अर्धे अंग सोन्याचे झाले होते.’

कृष्णाने युधिष्ठिराकडे पाहीले. आणि युधिष्ठिर समजून चुकला.”
“पण बाबा, ही काल्पनिक कथा नाही का? माणूस कितीही त्यागी असला म्हणून मुंगूसाचे अंग सोनेरी होईल का?” मी विचारले.
“तुझा मुद्दा मान्य. पण ही गोष्ट ज्याने कोणी रचली त्याला काय संदेश द्यायचा असेल? पिठाच्या कणांनी मुंगूसाचे शरीर सोनेरी होते असे सांगायचे असेल की अनोळखी वंचित माणसासाठी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा न करणे हा सर्वश्रेष्ठ यज्ञ होय?”
“अनोळखी वंचित माणसासाठी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा न करणे हा सर्वश्रेष्ठ यज्ञ होय, हे सांगण्यासाठी. पण बाबा असा त्याग करणे शक्य आहे का?”
“आपल्याला नसेल शक्य. आज आपल्या मनाची तेवढी तयारी झालेली नसेल. पण म्हणून त्यासाठी आदर्शाला आपल्या उंचीएवढा थोडाच बनवायचा असतो. मला झेपत नाही म्हणून आदर्शाची उंची कमी करा असे म्हणता येणार नाही. आपल्या मनाची तशी तयारी व्हावी म्हणून सतत प्रयत्न करायला हवेत.”
सतत प्रयत्न करायला हवेत हे माहीत असले तरी तसे प्रयत्न होत नाहीत. पण हे लक्षात यायला मला आणखी चार वर्षे लागली. आणि ते लक्षात आले संत एकनाथांचे चरीत्र वाचताना. नाथांना एका माणसाने एकदा प्रश्न विचारला की “तुम्ही नेहमीच चांगले वागता ते कसे? तुमच्यासारखे सतत चांगले वागायचे असे मी अनेकदा ठरवले पण अपयशी ठरलो.”
त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता नाथ म्हणाले, “माझ्या वागणूकीचे बाजूला राहू दे. मला वेगळेच काही जाणवू लागले आहे. तुमचे आयुष्य फक्त आठवडाभराचेच उरले आहे.”
तो माणूस पडलेल्या चेहर्‍याने निघून गेला. त्यानंतर सात दिवसानी नाथ त्याच्या घरी गेले. बिचारा अंथरुणावर पडून होता. नाथाना समोर पाहून तो चटकन अंथरुणातून उठून नाथांच्या पाया पडला,
नाथांनी विचारले, “आठवडा कसा गेला?”
“मृत्यू समोर दिसत असताना कसा जाणार? दुसरे काही सुचतच नाही,” तो म्हणाला.
“या आठवडय़ात तुझ्या मनात कितीदा दुसर्‍याविषयी वाईट विचार आले? कोणाशी भांडलास का? कोणाशी वाईट वागलास का?” नाथांनी विचारले.
“अजिबात नाही महाराज. उलट यापूर्वी ज्या मंडळींना दुखावले होते, त्यांची मी क्षमा मागितली. मृत्यू समोर दिसत असताना वाईट वागायचे कसे सुचेल?”
“माझ्या सतत चांगले वागण्याचे हेच रहस्य आहे. मी सतत मृत्यूची जाणीव ठेवत असतो. जन्मल्यापासून आपली घोडदौड मृत्यूच्याच दिशेने होत असते, हे वास्तव मी मनाला विसरू देत नाही!”
खरे म्हणजे जे काही आयुष्यभर करायचे ते शेवटचा क्षण गोड व्हावा म्हणून. शेवटच्या क्षणी परमेश्वराचे चिंतन घडावे म्हणून.
गीतेच्या आठव्या अध्यायात भगवान सांगतात,
अंतकाळी हि माझे चि चित्ती स्मरण राखूनी!
देह सोडूनि गेला तो मिळे मज न संशय!!
म्हणुनि सगळा काळ मज आठव झुंज तू!
मन बुद्धि समर्पूनि मज निःशंक पावसी!!
……….

पीएम किसानचा १४ वा हप्ता लवकरच येणार..?

सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीचे १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आहेत. त्यानंतर सर्व लाभार्थी १४ व्या हप्त्या ची प्रतीक्षा करीत आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हा हप्ता मे किंवा जून महिन्यात जारी केला जाऊ शकतो. त्यासाठी सरकारनेही पूर्ण तयारी केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा २००० रुपयांचे तीन हप्ते मिळतात. एकूणच सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक ६००० रुपये थेट जमा करते.