देवगड : श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट वतीने आज दि ११ मे रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन कुणकेश्वर येथे करण्यात आले होते. या आंबा महोत्सव निमित्ताने श्री देव कुणकेश्वर मंदिरात ११,१११आंब्यांची आरास करण्यात आली आहे . श्री देव कुणकेश्वराच्या शिवलिंगाभोवती गाभाऱ्यात देवगड हापूसची आरास करून सजावट केलेली आहे. त्याचबरोबर मंदिरातील बाहेरील नंदीगाभाऱ्यात देखील देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली.
देवगड हापूस आंब्याच्या आरासी मुळे श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसरात देवगड हापूसचा सुगंध दरवळत होता. मन प्रसन्न वाटत आहे. दरवर्षी ११ मेला श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षीही कुणकेश्वर मिठमुंबरी येथील आंबा बागायतदाराने आपल्या बागेत पिकवलेल्या हापूस आंबा श्री देव कुणकेश्वर मंदिरात आणून देतात.


