डॉ. रूपेश पाटकर
……..
“यांना राग खूप येतो,” अशी तक्रार करत मिसेस नाईक मिस्टर नाईक यांना घेऊन आमच्या ओपीडीत आल्या.
गंमत म्हणजे ते दोघे मुद्दाम आमच्या ओपीडीत आले नव्हते. ते आले होते ऑर्थोपेडीक ओपीडीत, मिस्टर नाईकांच्या आईच्या कंबरदुखीसाठी. तिथे त्यांचा नंबर यायला अजून वेळ होता आणि ऑर्थो ओपीडीच्या बाजूलाच आमची सायकीयॅट्रीची ओपीडी होती. आणि आमच्या ओपीडीत फारसे पेशन्ट त्यादिवशी नव्हते म्हणून मिसेस नाईक त्यांना सहज घेऊन आल्या होत्या.
“मी उगाच नाही चिडत,” मिस्टर नाईक म्हणाले.
“कालचीच गोष्ट. क्षुल्लक निमित्त झालं आणि काल दिवसभर हे उपाशी राहीले,” मिसेस नाईक म्हणाल्या.
ती दोघं बोलत असतानाच नाईकांच्या आई म्हणाल्या, “याचा स्वभाव थोडा तापटच आहे, त्याच्या वडिलांसारखा!”
“डॉक्टर, मी कारणाशिवाय चिडत नाही. मी कधी उगीचच चिडलो आहे का, ते विचारा त्यांना,” मिस्टर नाईक म्हणाले.
“राग येण्याच्या किंवा चिडण्याच्या अनेक कारणांपैकी ‘अयोग्य संवाद’ हे एक महत्त्वाचे कारण आहे. संवादात थोडे सावध राहून विसंवाद टाळता येऊ शकेल. दोन माणसांमध्ये वितुष्ट येण्याचे कारण काय याचा विचार करा. संवाद छेदक असेल तर विसंवाद होईल आणि पूरक असेल तर सुसंवाद राहील,” मी म्हणालो.
पण माझ्या छेदक आणि पूरक या शब्दांचा नेमका अर्थ काय हे त्यांच्या लक्षात आले नाही. ते त्यांना समजावून देण्यासाठी आणखी थोड्या स्पष्टीकरणाची गरज होती. मूळात, मी जेव्हा माझ्या पोस्टग्रॅज्युएशनच्या काळात पहिल्यांदाच ‘स्ट्रक्चरल ॲनॅलिसीस’ हे शब्द वाचले तेव्हा मला देखील ते समजले नव्हते. माझा सिनियर म्हणाला, “त्यात काही कठीण नाही. आपल्यात एक बालक असतो.”
आणि त्याने पुढ्यातल्या कागदावर एक लहान वर्तुळ काढले आणि त्याच्या आत बालक (Child) असे लिहिले. त्या वर्तुळाला लागूनच त्याच्या डोक्यावर आणखी एक वर्तुळ काढले आणि म्हणाला, “आपल्यात एक विचारी चालक देखील असतो.”
आणि त्याने त्या वरच्या वर्तुळाच्या आत लिहीले चालक (Adult). त्यानंतर त्याने त्या चालक वर्तुळच्या डोक्यावर त्या चालक वर्तुळाला लागूनच आणखी एक वर्तुळ काढले आणि म्हणाला, “आपल्यात एक पालक देखील असतो.” त्याने त्या सर्वात वरच्या वर्तुळाच्या आत लिहीले, पालक (Parent). आणि त्या एकावर एक घागरी ठेवल्याप्रमाणे दिसणार्या तीन वर्तुळांकडे पाहत तो म्हणाला, “हे तुझ्या स्वाभावाचे स्ट्रक्चर! असेच स्ट्रक्चर प्रत्येक माणसात असते.”
त्याने त्या वर्तुळांच्या बाजूला थोडे अंतर ठेवून तशीच तीन वर्तुळे काढली आणि म्हणाला, “हे माझ्या स्वभावाचे स्ट्रक्चर. मी तुला एक प्रश्न विचारतो- किती वाजले?” आणि हा प्रश्न विचारात असताना त्याने कागदावरील त्याच्या चालकाच्या वर्तुळापासून माझ्या चालकाच्या वर्तुळापर्यत एक बाण काढला.
मी घड्याळात बघितले आणि म्हणालो, “साडेसहा वाजलेत!”
माझ्या या उत्तरावर त्याने कागदावरील माझ्या चालकाच्या वर्तुळापासून त्याच्या चालकाच्या वर्तुळापर्यत दुसरा बाण काढला आणि म्हणाला, “आपला संवाद एकमेकाला पूरक झाला, म्हणून हे बाण समांतर गेले. पण समजा तू माझ्या किती वाजले या प्रश्नावर म्हणाला असतास की भिंतीवर घड्याळा आहे. दिसत नाही का तुला? तर त्याचा अर्थ तुझ्यातील खाष्ट पालकाने माझ्यातील बालकाला प्रश्न विचारला आहे असा झाला असता,” असे म्हणून त्याने कागदावरील माझ्या पालक वर्तुळापासून त्याच्या बालक वर्तुळापर्यत बाण काढला. हा बाण त्याच्याकडून आलेल्या बाणाला छेदत होता. ते दाखवत तो म्हणाला, “आपला संवाद आता विसंवाद होईल!”
घरात किंवा ऑफिसात घडणार्या छोट्यामोठ्या विसंवादाचे कारण अशा बाणांनी एकमेकांना समांतर न जाता एकमेकांना छेदणे हे असते.
हेच सर्व मी मिस्टर आणि मिसेस नाईकांना समजावून सांगितले.
मिस्टर नाईक म्हणाले, “काल असेच झाले. मी कामावर निघण्याच्या घाईत होतो. मला माझा मोबाईल सापडत नव्हता. मी हिला म्हटले, अगं, माझा मोबाईल कुठे? तर ही म्हणाली, आता मोबाईल देखील हरवलात. एक गोष्ट जाग्यावर ठेवाल तर शप्पथ! म्हणजे माझ्यातल्या चालकाने हिच्यातल्या चालकाला प्रश्न केला. पण हिच्या चालकाने उत्तर न देता हिच्यातल्या पालकाने माझ्यातल्या बालकाला उत्तर दिले. क्राॅस कनेक्शन!”
“मिसेस नाईक यांच्या चालकाने उत्तर दिले असते तर ते काय असते?” मी मिस्टर नाईकना विचारले.
“मी मिसकॉल देते म्हणजे कळेल कुठे आहे तो, असे उत्तर तिच्या चालकाकडून येऊ शकले असते!” मिस्टर नाईक म्हणाले.
“अहो, पण मी कणीक मळत होते. गॅसवर दूध ठेवले होते. ते टाकून मी कशी जाणार?” मिसेस नाईक म्हणाल्या.
“मग तुम्हीच सांगा, अशा परिस्थितीत तुमचा चालक काय उत्तर देईल?” मी विचारले.
“माझा चालक मी कशी कामात अडकले आहे ते सांगेल आणि त्यांचा मोबाईल कुठे असू शकतो त्याच्या जागा सुचवेल,” मिसेस नाईक म्हणाल्या.
मी दोघांकडे पाहून गालातल्या गालात हसलो.
“पण टाळी काही एका हाताने वाजत नाही. हे परवा म्हणाले, अगं माझा रुमाल कुठे लपवून ठेवलास तो सांग. मी काय यांचे रुमाल लपवून ठेवते काय?” मिसेस नाईक म्हणाल्या.
“माझा रुमाल कुठे लपवून ठेवलास? हा प्रश्न तुमच्यातल्या कोणी त्यांच्यातल्या कोणाला उद्देशून विचारला?” मी मिस्टर नाईकना विचारले.
“माझ्यातल्या चालकाने तिच्यातल्या चालकाला,” मिस्टर नाईक म्हणाले.
“वरवर हे असे वाटते खरे. पण ‘लपवून ठेवलेस’ हे शब्द तुमच्यातल्या पालकांने त्यांच्यातल्या बालकाला म्हटले आहेत,” मी म्हणालो.
“हो. मी खोचक बोललो,” मिस्टर नाईक म्हणाले. मिस्टर नाईकना त्यांच्या शब्दातील तृटी लक्षात आली आणि त्यांनी ती प्रांजळपणे व्यक्त केली. त्यांच्या अशा प्रांजळपणे व्यक्त होण्याचा परिणाम मिसेस नाईकांवर झाला.
“डॉक्टर, माझ्याकडून देखील असे खोचक बोलले जाते कधीकधी. आता मी माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवेन,” मिसेस नाईक म्हणाल्या.
“एकदा क्राॅस कनेक्शन झाले की पुढच्या बोलण्यात मूळ विषय बाजूला पडतो. आणि नको ती उणीधुणी निघतात. ती रागाच्या भरात असतात. त्यात कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवत बसण्यात काहीच उपयोग नसतो. यावर तिरकस बोलणे टाळणे हाच उपाय,” मिस्टर नाईक समाधान व्यक्त करत हसले.
ते तिघे ओपीडीतून बाहेर निघत असताना मिस्टर नाईकांच्या आई मागे वळल्या आणि म्हणाल्या, “हे आम्हालाही आमच्या तरुणपणी कळले असते तर किती बरे झाले असते!”
……
डॉ. रुपेश पाटकर
तुम्ही छेदत तर नाही ना?
आयकर विभागात नोकरीची मोठी संधी..!
मुंबई : आयकर विभागाने तरुण व्यावसायिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आयकर विभाग भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाची संकेतस्थळावर दिली आहे.
मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद
मुंबई : मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला गती देता यावी यासाठी २७ ऑगस्ट पासून गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतुक पोलीसांकडून याबाबतची अधिसुचना जारी करण्यात आली
लंपीचा धोका वाढतोय..?
मुंबई : राज्यातील दहा जिल्ह्यांमधील जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यात प्रामुख्याने सोलापूर, नगर, हिंगोली, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्य सरकार लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आतापर्यंत ७० टक्के जनावरांना लस देण्यात आली आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले. राज्यात यंदा लम्पी चर्मरोगाचा उद्रेक झाला असून, गोवंशीय जनावरांमधील हा आजार २५ जिल्ह्यांत पसरला आहे. चालू आर्थिक वर्षांत एप्रिलपासून लम्पीने ३८ हजार ६९७ पशुधन बाधित झाले तर ३,२४६ जनावरे दगावल्याची माहिती मिळतेय.
बिलयर्डचे चेंडू….?
डॉ. रूपेश पाटकर
तुम्हाला बिलयर्डचा खेळ माहीत आहे का? मी तो प्रत्यक्षात कधीच पाहिला नाहिये. सिनेमात फक्त पाहिलाय. त्यात कॅरमबोर्डसारख्या बोर्डावर अनेक गुळगुळीत चेंडू ठेवलेले असतात आणि खेळणारी मंडळी एका बारीक काठीच्या टोकाने एका चेंडूला ढकलतात. तो चेंडू मग दुसर्या चेंडूंना ढकलतो. हे वर्णन मला आज का आठवतेय माहीत आहे का? कारण माझा एक क्लाएंट आज मला हे सांगून गेला की “माणूस हा बिलयर्ड खेळातील चेंडूसारखा असतो. कुठे जायचे? कोणत्या गतीने जायचे? हे त्या चेंडूंसारखे त्याच्या हातात नसते. ते त्याच्यावर आपटणार्या दुसर्या चेंडूवर अवलंबून असते. नव्हे, ते मूळात काठीने पहीला चेंडू किती जोराने, कोणत्या दिशेत ढकलला यावर अवलंबून असते. चेंडूने फक्त धक्के बसतील तसे गडगडत जावे, बस.”
त्याने आपली तुलना बिलयर्ड चेंडूशी करताच मला डॉ. व्हिक्टर फ्रँकल आठवले. डाॅ.फ्रँकल हे मनोविकारतज्ज्ञ होते, पण त्यांनी आयुष्याची तब्बल चार वर्षे नाझी जर्मनीच्या छळछावण्यात एक युद्धकैदी म्हणून घालवली होती. या काळात त्यांची गरोदर पत्नी, भाऊ भावजय, आईवडील ठार मारले गेले. त्यांना ज्या छळछावण्यात ठेवण्यात आले होते, तेथून जीवंत परत जाण्याची अजिबात शक्यता नव्हती. त्यांना जेव्हा तिथे नेण्यात आले तेव्हा त्यांच्या सोबतच्या काम करू न शकणार्या माणसाना गॅसचेंबरमध्ये घालून ठार करण्यात आले. अपुरे अन्न, कडाक्याची थंडी, विश्रांती जवळपास नाहीच अशा स्थितीत एक दिवस आपण देखील कामासाठी निरुपयोगी ठरू आणि गॅसचेंबरमध्ये पाठवले जाऊ हेच भविष्य स्पष्ट दिसत होते. अशा परिस्थितीत त्यांच्या सोबतचे अनेक कैदी हताश होऊन आत्महत्या करीत. पण त्या निराश परिस्थितीत डाॅ.फ्रँकल मात्र तग धरून राहीले. अशा परिस्थितीतून गेलेला हा माणूस म्हणतो की माणसाकडून सारे काही हिरावून घेतले तरी एक गोष्ट त्याच्याकडून हिरावून घेतली जाऊ शकत नाही, आणि ती म्हणजे कोणत्याही प्रसंगाला कोणती भावनिक प्रतिक्रिया द्यावी याचे स्वातंत्र्य! तुमच्या मनात तुम्ही काय विचार करता हे कोणीही ठरवू शकत नाही. छळछावणीतील त्या भयाण दिवसात डॉ.फ्रँकल कोणता विचार करत होते, माहित आहे का? ते विचार करत, एका भाषणाचा! कसले भाषण? ‘छळछावणीतील छळाचा तेथील कैद्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम!’ हे जेव्हा मी वाचले तेव्हा मला या माणसाची कमाल वाटली. ते जो विचार करत होते, तो त्यावेळी अशक्यकोटीतला होता. नाझी फौजा हरल्याशिवाय ते शक्य नव्हते. आणि नाझींचा पराजय होईल असे कोणालाच वाटत नव्हते. अशी परिस्थिती असतानाही ते एक दिवस हरतील. तोपर्यंत आपण जीवंत राहू. आपली सुटका होईल. आणि त्यानंतर आपल्याला छळ छावणीतील अनुभवावर बोलायला बोलवतील, तेव्हा आपण कसे भाषण द्यावे, कोणते मुद्दे मांडावे याचा विचार ते करत होते. वजनदार लोखंडी पाईप उचलून नेताना, पाईपलाईनसाठी खोदाई करताना एका बाजूला त्यांचे शरीर श्रमत होते आणि दुसरीकडे डोक्यात भाषणाचे चित्र हा माणूस रंगवत होता. त्यांनी जगाला सांगितले की माणूस प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनवू शकतो, अगदी आपल्याला सर्वात hopeless वाटणारा क्षणदेखील! त्यांनी अर्थपूर्ण जगण्याची शिकवण देणाऱ्या ‘लोगो थेरपी’ नावाच्या उपचार पद्धतीचा सिद्धांत मांडला.
‘ट्रांझक्शनल ॲनॅलिसीस’ या उपचार पद्धतीवर पुस्तके लिहून तिचा प्रसार करणारे डॉ. थॉमस हॅरिस स्पष्टच म्हणतात, “बिलयर्डचा चेंडू आणि माणूस यात मूलभूत फरक आहे. चेंडू निर्जीव आहे. त्याला जसे ढकलले जाते, तसा तो सरकत रहातो. पण माणसाचे तसे नाही. माणूसाला मेंदू आहे. तो विचार करतो. त्याच्या विचाराचे देखील एक वैशिष्टय़ आहे, ते म्हणजे तो केवळ होऊन गेलेल्याच गोष्टीचा विचार करतो असे नाही तर अजून न घडलेल्या भविष्यातील संभावनांचा देखील तो विचार करतो.”
डॉ. हॅरिस यांचा हा मुद्दा बारकाईने समजून घ्यायला हवा. जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट पद्धतीने वागताना दिसते तेव्हा आपण तिच्या वागण्याचे कारण शोधू लागतो आणि आपण म्हणतो की तिच्यावर अमुक संस्कार झाले किंवा तिचे बालपण अमुक वातावरणात गेले म्हणून ती तशी वागते. म्हणजे तिच्या आजच्या भल्याबुर्या वागण्याला तिला बालपणात मिळालेले संस्कार जबाबदार आहेत. इथे डॉ. हॅरिस असा प्रश्न उपस्थित करतात की असे जर स्विकारले तर मग माणसाच्या कोणत्याही कृत्याला तो माणूस स्वतः जबाबदार नाही असे म्हणावे लागेल. हे खरे आहे का? माणसाचे आजचे वागणे, त्याच्यावर भूतकाळात झालेल्या संस्कारांवरच केवळ अवलंबून आहे का? या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर माणूस म्हणजे बिलयर्डचा चेंडू ठरेल. डॉ. हॅरिस यावर अधिक विचार करण्यासाठी आणखी एक प्रश्न करतात. एकाच प्रकारचे बालपण मिळालेल्या सगळ्या व्यक्ती एकाच तर्हेने वागत नाहीत, त्याचे कारण काय? त्याचे कारण माणसाचे विचार करणे. भविष्यातील संभावनांचा विचार करणे, आपल्या कृत्याच्या परीणामांचा विचार करणे. त्यामुळे माणूस हा असहाय्यपणे धक्के खात गडगडत जाणारा बिलयर्डचा चेंडू नाही.
“मग माणसे बदलत का नाहीत? वर्षानुवर्ष एकाच तर्हेने ती का वागत रहातात?” माझ्या दुसर्या एका क्लायंटने विचारले होते.
“माणसांना कसे बदलायचे हे माहीत नसते म्हणून ती बदलत नाहीत!” कोणत्याही घटनेला त्यांचा ठरलेला विशिष्ट प्रतिसादच का येतो? दरवेळी नव्या उमेदीने नवी नोकरी धरणारे श्रीमान शूमेकर काही महिन्यातच नोकरीचा तडकाफडकी राजीनामा का देतात? यापुढे बायकोशी वाद घालायचा नाही असे कौटुंबिक सल्ला केंद्रात ठरवून निघालेल्या विक्रांतचे दुसर्याच दिवशी त्याच्याही नजरेत क्षुल्लक असणाऱ्या कारणावरून बायकोशी टोकाचे भांडण का होते? याचे स्पष्ट कारण आपल्या मनातील बालकात (Child) आणि पालकात (Parent) रेकॉर्ड झालेल्या गोष्टी तशाच प्रकारच्या प्रसंगात पुन्हा वाजायला लागतात हे आहे. हे जर जाणीवपूर्वक बदलायचे असेल तर आपल्यातला चालक (Adult) मजबूत करायला हवा. त्याने आपल्या बालकात (Child) आणि पालकात (Parent) मध्ये काय दडले आहे हे शोधायला हवे आणि आजच्या वास्तवावर तपासायला हवे. त्यासाठी आपला संवाद तपासायला हवा. आपण जे दुसर्याशी बोललो, दुसर्याला जो प्रतिसाद दिला, तो आपल्यातील कोणाचा होता, पालकाचा, चालकाचा की बालकाचा? आपल्यातील चालकाने त्या परिस्थितीत कोणता प्रतिसाद दिला असता? याचा सतत अभ्यास करणे म्हणजे आपल्या चालकाला बलवान करणे.
स्वतःच्या पालक- चालक- बालक यांना तपासण्यासोबतच हेदेखील लक्षात घ्यायला हवे की समोरच्या व्यक्तीत देखील बालक (Child) आणि पालक (Parent) यांचे रेकॉर्डिंग आहे. समोरची व्यक्ती आपल्याशी बोलताना तिचा पालक (Parent) बोलतोय की तिचा चालक (Adult) बोलतोय की बालक (Child) बोलतोय हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आणि ते आपल्यातील कोणाशी बोलतात हेदेखील लक्षात घ्यायला हवे. श्रीमती रोझा यांच्याबाबतीत घडलेल्या एका प्रसंगातून आपण हे समजून घेऊ. श्रीमती रोझा सकाळी कपड्याच्या दुकानात गेल्या होत्या. त्यांना त्यांच्या भाचीच्या लग्नात वापरण्यासाठी नवा ड्रेस हवा होता. दुकानातील सेल्समनने त्यांना अनेक ड्रेस दाखवले. त्या ते बघत असताना त्याने आणखी काही ड्रेस काढले आणि त्यातील आकाशी रंगाचा ड्रेस दाखवत तो म्हणाला, “हा नवीन स्टॉक आला आहे. तुम्हाला हा आकाशी ड्रेस भारी दिसला असता, पण थोडा महाग आहे. तुमच्या बजेटमध्ये बसेल का?”
“भाचीचे लग्न पुन्हा पुन्हा थोडेच होणार आहे. हाच ड्रेस द्या!”
श्रीमती रोझा यांनी सेल्समनने सांगितलेला तो महाग ड्रेस खरेदी केला.
खरं म्हणजे त्यांना दुसरा चॉकलेटी रंगाचा ड्रेस आवडला होता. पण त्यांनी आपल्याला आवडलेला ड्रेस खरेदी न करता, सेल्समनने सांगितलेला खरेदी केला. वरवर पाहता रोझाबाई आणि सेल्समन यांच्यातील संवाद दोन चालकांमधला (Adult मधला) वाटतो. पण प्रत्यक्षात तो तसा नाहिये. त्या सेल्समनच्या पालकाने (Parent ने) रोझाबाईंच्या बालकाला (Child ला) उचकावले आहे. आणि त्यांच्यातील बालकाने सेल्समनने सांगितलेला ड्रेस खरेदी केला आहे.
मी जेव्हा अशा तर्हेच्या संभाषणांविषयी पहिल्यांदा वाचले तेव्हा माझ्या लक्षात आले की रोझाबाई एकट्याच अशा नाहीत, मीदेखील कित्येक प्रसंगी असा वागलेलो आहे.
हे टाळायचे असेल तर आपल्यातील चालकाला (Adult ला) मजबूत केले पाहिजे. रोझाबाईंचा चालक मजबूत असता तर त्या म्हणाल्या असत्या, “तुम्ही दाखवलेला ड्रेस छान आहे. पण मला मात्र हा चाॅकलेटी रंगाचा ड्रेसच घ्यायचा आहे!”
……
डॉ. रुपेश पाटकर
डॉक्टर, मी निर्णय काय घेऊ?
डॉ. रूपेश पाटकर : शर्मिला ही एकोणतीस वर्षांची वकील तरुणी. सतत चिंता वाटत राहते अशी तक्रार घेऊन ती आमच्या ओपीडीत आली होती. तिच्याशी थोडे बोलल्यानंतर ती म्हणाली, “डॉक्टर, मला एक मुलगा आवडतो. मी त्याला गेल्या पाच वर्षापासून ओळखते. मला वाटते, तो मला अनुरूप जोडीदार आहे. मी कोणता निर्णय घेऊ?”
मी हसलो आणि म्हणालो, “तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. तुझ्यासाठी दुसरा कोणी निर्णय घेणार नाही. तुला निर्णय घ्यायला स्पष्टता यावी, यासाठी मदत करण्याचे काम सायकीयॅट्रीस्टचे आहे. प्रत्यक्ष निर्णय तुलाच घ्यायचा आहे.”
“डॉक्टर, तोच तर प्रॉब्लेम आहे. विनू मला अनुरूप आहे, हे मला माहीत आहे. पण मला निर्णय घेता येत नाहीए,” ती म्हणाली.
“का?”
“समजा, माझा निर्णय चुकला तर.. हा विचार येतो आणि मी विनूशी लग्न करायचे पुढे ढकलते. आता तो सुद्धा वैतागायला लागलाय. तो तरी किती दिवस वाट पहाणार. पण मला समजत नाही काय करायचे ते,” ती म्हणाली.
शर्मिला आणि विनूच्या लग्नाला तिच्या आईबाबांकडून विरोध होता. कारण विनू आणि शर्मिलाची जात वेगवेगळी होती. त्यांनी शर्मिलाला सांगितले होते की तिची इच्छाच असेल तर ते तिचे लग्न विनूशी करून देतील. पण त्यांना त्यात खुशी नाही. लग्नानंतर जर काही अडचण आली तर त्याची जबाबदारी शर्मिलाची स्वतःची असेल.
आतापर्यंत कोणताही निर्णय घेताना शर्मिलाला विरोध झाला नव्हता. नव्हे, आतापर्यंत तिने स्वतः कोणताच निर्णय घेतला नव्हता. तिची शाळा, तिचे कॉलेज, तिने कोणती शाखा निवडावी, कोणते विषय घ्यावे हे तिच्यावतीने आईवडिलांनीच ठरवले होते. तिचा निर्णय चुकीचा ठरून तिला प्रॉब्लेम येऊ नयेत या नादात त्यांनी तिला कधी निर्णयच घेऊ दिला नव्हता. पण ‘आपला आपण निर्णय घेतला तर तो चुकेल’ असा संदेश मात्र तिच्या मनातील बालकात (Child) रेकॉर्ड झाला होता. आता पहिल्यांदाच तिच्या आई वडिलांनी अनिच्छेने किंबहुना ‘तू चूकशील’ असा अप्रत्यक्ष संदेश देत निर्णय घ्यायची जबाबदारी तिच्यावर टाकली होती. तिच्याकडे निर्णय घेण्याचा अनुभव नव्हता आणि मनातील बालक (Child) निर्णय घ्यायचा विचार केला की घाबरून जाई आणि तिच्यातील पालकाचे (Parent) रेकॉर्ड ‘तू चूकशील’ ही कॅसेट वाजवत बसे.
निर्णय घेण्यात असमर्थता सांगणारी दोन प्रकारची मंडळी मला भेटत असतात. एक शर्मिलासारखी निर्णय घेणे सतत पुढे ढकलत रहाणारी आणि दुसरी आपण चुकीचे निर्णय घेऊन कसे आतापर्यंत फसत आलो याचा पाढा वाचणारी.
निर्णय घेता न येणे हा त्यांचा प्रॉब्लेम असतो आणि तो त्यांना ठाऊक असतो. पण फक्त प्रॉब्लेम माहीत असून तो थोडाच सुटणार. निर्णय घेण्याचा प्रॉब्लेम सुटण्यासाठी आपल्या मनातील पालकात (Parent) आणि बालकात (Child) काय रेकॉर्डिंग आहेत ती तपासली पाहिजेत. ती तपासण्यासाठी आपल्यातील चालकाला (Adult) कार्यरत केले पाहिजे. हे कसे करायचे त्याचे उत्तम मार्गदर्शन डॉ. थॉमस हॅरिस यांनी श्रीमान ऑरनीश यांचे उदाहरण देऊन केले आहे.
श्रीमान ऑरनीश हे सुमारे चाळीशीचे कुटुंबवत्सल गृहस्थ आहेत. आपण त्यांना एक जबाबदार नागरिक असेही म्हणू शकतो. त्यांना आज सकाळीच एका ओळखीच्या सद्गृहस्थांचा फोन आला. त्यांनी ऑरनीशना सांगितले की संसदेत येऊ घातलेल्या वर्णद्वेषविरोधी विधेयकाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम चालू आहे. त्या निवेदनावर सही करण्यासाठी ऑरनीश यांनी यावे. ते विधेयक सर्व वर्णांच्या लोकांना विनाअडथळा कुठेही रहाण्याचा अधिकार मान्य करण्याबाबत होते. पण फोन ठेवल्यापासून ऑरनीशना बेचैन वाटू लागले आणि आजचा चांगला दिवस खराब होईल, अशी काहीशी भावना त्यांच्या मनात उद्भवली.
डॉ. हॅरिस यांनी दिलेले हे उदाहरण मला रोचक वाटले. एखाद्या निवेदनावर सही करण्याचे एवढे काय टेंशन घ्यावे माणसाने. हवी तर सही करावी, नाहीतर नाही म्हणून आपल्या कामास लागावे.
डॉ. हॅरिस यांनी पुढे काय लिहिले आहे, ते मी उत्सुकतेने वाचू लागलो.
काय दडले आहे, ऑरनीश साहेबांच्या पालकात (Parent)? याचा मागोवा डॉ. हॅरिस घेऊ लागले तेव्हा त्यांना जाणवले की त्यांच्या पालकात ‘तुमचे कुटुंब आणि तुमची मुले यांचे हीत तुम्ही आधी पाहायला हवे’; ‘कोणी सांगितलेय तुम्हाला नको त्या गोष्टीत नाक खुपसायला?’; ‘तुमच्या कर्माने घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळता कामा नये’; ‘तुम्हीच का? बाकीचे नाहियेत? ते बघून घेतील’; ‘लष्कराच्या भाकर्या भाजायला कोणी सांगितल्यात?’ हे हुकूम वजा विचार भरलेले आहेत.
पण ऑरनीश साहेबांच्या पालकात एवढेच नव्हते. ‘निग्रो’ या तुच्छता दर्शक शब्दाखाली बरेच काही झाकलेले होते. ‘त्यांना त्यांच्या पायरीवरच ठेवायला हवे’; ‘ते निग्रो आहेत बस, यापुढे एक शब्द बोलायचा नाही.’ (ऑरनीश यांच्या कानात निरुपद्रवीसे वाटणारे एक बडबडगीत कोणे एके काळी गुणगुणले गेले होते, ‘इनी मिनी मीनी मो, कॅच ए नीगर बाय द टो!’) अगदी लहान वयात त्यांच्या मनातील पालकात (Parent) झालेले रेकॉर्डिंग पुढच्या आयुष्यात सतत पालकांकडून मिळणार्या आज्ञासदृश्य सूचनांमुळे मजबूत होत गेले होते.
ऑरनीश यांच्या मनातील बालकाचे (Child) रेकॉर्डिंग निग्रो शब्दाशी भीतीची भावना वाजवत होते. ‘मी निग्रोना पाठींबा दिला तर मला माझ्या गोर्या समाजात काय म्हणतील?’ ‘उद्या समजा, माझ्या मुलीने एखाद्या निग्रोलाच नवरा म्हणून पसंत केले तर…’ वगैरे.
ऑरनीश साहेबांच्या बालक आणि पालक यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर त्यांच्या मनातील चालक (Adult) कसा विचार करत असेल याची उत्सुकता मला वाटली. त्यांच्या चालकाविषयी बोलताना डॉ. हॅरिस म्हणाले, “श्रीमान ऑरनीश हे जर फारसा ‘विचार न करणारे’ सामान्य माणूस असते, तर त्यांच्या मनात गोंधळ उडालाच नसता. ते आपल्या मनातील पालकाकडे (Parent कडे) कारभार सोपवून मोकळे झाले असते. आणि निवेदनावर सही करायची नाही, असा निर्णय घेऊन मोकळे झाले असते.
पण त्यांच्यातील चालक (Adult) वर्णद्वेषाचे गांभीर्य समजून निर्णय घेऊ इच्छित होता. त्यांच्या चालकाला गुलामगिरीचे पाप समजत होते. त्याला कृष्णवर्णीयांना गुरांप्रमाणे वागणूक देण्यातले क्रौर्य समजत होते.
इथे ऑरनीशना त्यांच्या पालक (Parent), चालक (Adult) आणि बालक (Child) या तिघांतील माहितीचे विलगीकरण करण्यास शिकवण्याची गरज होती. इथे लक्षात ठेवले पाहीजे की ऑरनीशना सामोरे जावे लागले तशा प्रसंगात अनेकदा पालक (Parent) चालकाला (Adult ला) दूषित करतो.
दुसरी पायरीवर चालकाला घेऊन वरील तिन्ही गटातील माहिती तपासण्याची गरज होती. डॉ. हॅरिस यांनी ऑरनीशना सांगितले की त्यांनी त्यांच्या मनातील पालकाला (Parent ला) विचारायला हवे की त्याचे पालक वर्णद्वेषासारख्या गोष्टींवर विश्वास का ठेवत होते? त्यांनी त्यांच्या मुलांना निग्रोंबाबत भिती का घातली? ते त्यांच्या स्वतःच्या पालक- चालक- बालक यांचा पडताळा घेऊ शकण्यास सक्षम होते की नव्हते? त्यांची ज्या मतांवर श्रद्धा होती, ती मते सत्याला धरून होती की नव्हती? याचा त्यांनी कधी विचार केला होता का? गोरे लोक काळ्या लोकांपेक्षा श्रेष्ठ असतात काय? वर्णद्वेषाविरोधात भूमिका घेणे म्हणजे गोर्या लोकांच्या न्याय हक्काना विरोध करणे आहे काय? ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजातील प्रश्नांबाबत आपण का भूमिका घ्यायची नाही?
दुसरा मुद्दा ऑरनीश यांच्या मनातील बालकाला (Child ला) तपासण्याचा होता. बालकाला वाटणारी भिती रास्त आहे का? लहान वयात वाटणारी भिती वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी का वाटावी? उलट त्रेचाळीसाव्या वर्षी घेतलेल्या स्टेप्स वास्तव बदलण्यास हातभार लावून समाजातील विकृती संपवू शकतात, याची जाणीव ऑरनीश यांना करून द्यावी लागली.
ऑरनीशप्रमाणे शर्मिलाला देखील तिच्या पालक- चालक- बालक यांचा शोध घ्यायला मदत करावी लागली. त्यांचे विलगीकरण करून त्यांना प्रश्न विचारण्यास शिकवावे लागले. आईवडिलांच्या इच्छा, आज्ञाधारकपणा, संस्कार, लोक काय म्हणतील, जात वगैरेबाबत तिच्या पालकातील अट्टाहासांना प्रश्न करायला मदत करावी लागली. ‘कर्तव्य म्हणून आम्ही तुझे लग्न करून देऊ, पण त्यात आमचा आनंद असणार नाही. पुढील परिणामांची जबाबदारी तुझी’ असे सांगून शर्मिलाच्या मनातील बालकाला भिती घालून निर्णय घेणे डळमळीत करण्याचा खेळ तिचे पालक खेळत आहेत का, हेदेखील तिला तपासायला सांगावे लागले.
तिने लगेच निर्णय घेतला नाही. पण आपण निर्णय घेण्यास टाळाटाळ करण्यामागचे कारण तिला स्पष्ट झाल्याने तिचा ताण बराच कमी झाला. आमच्या शेवटच्या भेटीनंतर सहा महिन्यानी शर्मिला आमच्या क्लिनिकमध्ये पुन्हा आली. “डॉक्टर, मी शेवटी लग्नाचा निर्णय आत्मविश्वासाने घेतलाय,” असे हसतमुखाने सांगत तिने तिच्या लग्नाची पत्रिका माझ्या हातात दिली.
……
डॉ. रुपेश पाटकर
मुंबई – गोवा महामार्गावर पुन्हा अपघात ; एकाचा मृत्यु
कुडाळ : मुंबई – गोवा हायवेवर पावशी ग्रामपंचायत नजीक सोमवार २१ आॅगस्टला सकाळी दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर अन्य एक जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर पावशी ग्रामपंचायत येथील मिडलकटमधून दुचाकी नेत असताना दुचाकीची धडक भरधाव कारला बसली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कुडाळ येथे नेण्यात आले. मात्र, दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच कळतय. तर अन्य एक जखमी असून त्याला पुढील उपचारांसाठी ओरोस इथं नेण्यात आले आहे. हा अपघात अनधिकृत मिडलकटमुळे झाला असल्याची चर्चा स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.
Darmowy Bonus Kasyna Online Bez Depozytu 2026
Zapewne wielu nowych graczy zastanawia się nad tym, gdzie można znaleźć najlepsze bonusy kasynowe. Wydaje się, że kasyna bardziej koncentrują się na nowych graczach. Rzecz jasna sloty pomijamy, kluczowy jest regulamin kasyna. Jeśli kasyno przyznaje kody bonusowe, taka informacja powinna znaleźć się w regulaminie działalności. Ponadto ważne są cele, jakie firma stawia przed sobą. Wydaje się, że jest to temat, na który można różnie patrzeć – proste zasady, ale z sukces zależny jest od szczęścia.
A wysokiej jakości gry hazardowe i bonusy bez depozytu zapewniają niezapomniane wrażenia z darmowej gry w kasynie. Na HolyMolyCasinos, jesteśmy oddani pomaganiu graczom Polska w znalezieniu najlepszych bonusów kasynowych, Skolim Kasyno promocji i ofert promocyjnych w 2026. Dlatego też stworzyliśmy obszerną listę kategorii bonusów, aby pomóc Ci znaleźć idealną ofertę dla Twoich potrzeb. Bonusy w kasynach online są istotnym aspektem doświadczenia w grze, ponieważ dostarczają graczom dodatkowych funduszy, darmowych spinów lub innych atutów, które wzbogacają ich grę. Od bonusów bez depozytu i darmowych spinów po ekskluzywne promocje, nasz obszerny przewodnik to jedno miejsce dla wszystkich rzeczy związanych z bonusami w kasynie.
Dostępne gry kasynowe obejmujące darmowe bonusy bez depozytu obejmują liczne zróżnicowane tytuły. Wygrane uzyskane obejmujące bonusy bez depozytu będą mogły bezpiecznie dotrzeć do celu. Najważniejsze w tym zakresie są wymagania dotyczące zakładów w kasynach online, a bonusy bez depozytu nie są ich niestety pozbawione. Nie jest to jakoś szczególnie skomplikowane, gdyż wygrane uzyskane poprzez bonus bez depozytu za rejestrację wymagają spełnienia najpierw zaledwie kilku kroków.
Wymóg obrotu bonusem to mnożnik, który określa, ile razy musisz obstawić swoje środki bonusowe lub wygrane uzyskane za pomocą free spinów bez depozytu. Jeśli jakieś polskie nowe kasyno online oferuje taki bonus swoim graczom, możesz być pewny, że dowiesz się o tym jako pierwszy! Obecnie praktycznie każdy atrakcyjny bonus powitalny i inne regularne premie posiadają warunki bonusu, które musisz spełnić, aby móc wypłacić bonus kasynowy. Warunki obrotu często spędzają sen z powiek graczom, którzy chcą zdobyć bonusy kasynowe.
कोकणात सापडला ‘हा’ दुर्मिळ साप
वेंगुर्ला : तुळस गावातील चूडजीवाडा इथं सर्पमित्र महेश राऊळ यांनी दुर्मिळ अशा कॅस्ट्रोज कोरल सापाला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. २०२१ मध्ये सर्पमित्र महेश राऊळ यांना असा अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल साप आढळला होता. दोन वर्षांनी पुन्हा एकदा हा अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल साप आढळून आला.
सिंधुदुर्ग जिल्हा जैवविविधतेने समृद्ध आहे. महेश राऊळ हे गेले अनेक वर्ष भर वस्तीत आलेले साप सुरक्षितरित्या रेस्क्यू करून ते नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करतात. ते परिसरात सर्पमित्र म्हणून सुपरिचित आहेत.
सिंधुदुर्ग मध्ये हा त्यांना दुसऱ्यांदा साप मिळाला आहे. हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून अतिशय दुर्मिळ असा आहे. हा साप पाहण्यासाठी सर्पमित्र भटकत असतात, हा साप दिसावा म्हणून संशोधनही केले जाते.
हा साप विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणारा आणि फारसा दृष्टीस पडत नाही. याचा रंग ब्राऊन ब्लॅक असून पोटाखालून पूर्णपणे भगवा असतो. आणि त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे धोतक मानले जाते. दगडाखाली आणि पाला पाचोळ्याखाली हा साप नेहमी राहतो. त्याचे भक्ष छोटे बेडूक सरडे पाली गांडूळ इत्यादी आहे.
नितीन देसाई यांच्यावर केवढं होत कर्ज..?
मुंबई : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, त्यांच्यावर मृत्यूपूर्वी तब्बल २४९ कोटींचं कर्ज होतं, अशी माहिती आता समोर आली आहे.