कणकवली : फोंडाघाट चेकपोस्टवर सावंतवाडीहून कोल्हापूरच्या दिशेने जात असलेली चारचाकी १९ जून रोजी रात्री ८.३० सुमारास चेक पोस्टवर आली असता, तेथे कार्यरत असलेले नितीन बनसोडे व सागर देवार्डेकर यांनी तपासली असता या कारमध्ये सुमारे 38 लाख 67 हजार रोख रक्कम आढळून आली. असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कणकवली पोलीस निरीक्षक तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.
सर आली धावून पर्यायी मार्ग गेला वाहून
दोडामार्ग : पावसाळा सुरू झाला तरी अत्यावश्यक असलेल्या तळकट – कोलझर पुलाचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्याने त्याचा मोठा फटाका त्या पंचक्रोशीतील गावांना बसला आहे. रविवारी या अर्धवट पुलाच्या ठिकाणी काम सुरू असल्याने रहदारी साठी नदीपात्रात पाईप टाकून उभारलेला तात्पुरता मार्ग वाहून गेला आहे. त्यामुळे आता तळकट पासून पुढील सर्व गावांचा तळकट बांदा अन सावंतवाडीशी संपर्क पूर्णतः तुटला आहे.
दोडामार्ग तालुक्यातील तळकट ते कोलझर या मार्गावर नवीन पुल होत आहे. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे व बांधकाम खात्याच्या उदासिनेमुळे पावसाळा सुरू होऊनही काम अर्धवट राहिले. आणि पुल बांधकाम सुरू असल्याने उभारलेला पर्यायी मार्ग पावसाच्या पाण्याचा नदीपात्रात वाढलेल्या प्रवाहाने तो मार्ग वाहून गेला. त्यामुळे कोलझर कुंब्रल, कुडासे, पणतूर्ली, भरपाल या गावांसह तळकट हून दोडामार्गकडे येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांचे खुप हाल होणार आहेत.
एका पराभवाने खचून जायचं नाही | विनायक राऊतांचा INDIA आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद
दोडामार्ग : आपण येथील जनतेच्या विश्वासावर कुठे कमी पडलो याचे समीकरण करून इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आता जोमाने कामाला लागा. शिवाय येणाऱ्या सर्व निवडणुकीत आपल्याला जिंकायचं आहे असा उत्साह माजी खासदार विनायक राऊत यांनी इंडिया आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये भरला.
माजी खासदार विनायक राऊत दोडामार्ग तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी येथील इंडिया आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासमवेत बैठक नुकतीच संपन्न झाली.
त्यावेळी राऊत बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना घारे परब, उबाठा जिल्हाध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाध्यक्ष जानवी सावंत, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, तालुकाप्रमुख संजय गवस , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, गितेश राऊत, युवासेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाठ, जिल्हा बँक संचालक गणपत देसाई, माजी जि. प. सदस्य संपदा देसाई, जिल्हा सरचिणीस प्रा. संदीप गवस, आबा सावंत, नगरसेवक चंदन गावकर, मदन राणे, मिलिंद नाईक, संदेश राणे आदी उपस्थित होते.
यावेळी राऊत बोलताना म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात मते कमी का पडली असे कार्यकर्त्यांना विचारले असता धनशक्ती चे कारण देतात. पण या धनशक्तीचा वापर रत्नागिरी जिल्ह्यात पण झाला आहेच ना मग तिथे पण मते कमी पडायला हवी होती. पण रत्नागिरीत तसे झाले नाही त्यामुळे आपण कुठे तरी कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्यास कमी पडतोय असे व्हायला नको आपल्या या पुढे सर्व निवडणुका जोमाने जिंकायच्या आहेत.
*जनसंपर्क वाढावा – राऊत*
दोडामार्ग तालुक्यातूनही कमी मते मिळाली याचा विचार करता आपण कुटे कमी पडलो याचा विचार व्हायला हवा. शिवाय येथील जनतेला भेटा त्यांच्या गाठीभेटी घ्या आमच काय चुकलं हे त्यांना विचारा. त्यांनी सांगितलेल्या चुका परत होणार नाही याची काळजी घ्या. लोकांची कामे करा. त्यांना नाव नवीन योजना कशी मिळवून देता येतील याकडेही गांभीर्याने बघा. इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित काम करा व येथील जनतेचे प्रश्न सोडवा असेही उपस्थितांना सांगितले.
लोकसभा निवडणुकीत हरलो म्हणून सगळ्याच निवडणुकीत आपण हरणार अशी जर मानसिकता असेल तर ती बदला. येणाऱ्या सर्व निवडणुका ही अत्यंत महत्वाच्या आहेत. झालेल्या चुका सुधारून लोकांचे गाऱ्हाणे ऐकून त्याप्रमाणे कामे करा. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करा आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीत आपलाच विजय होईल अशी मानसिकता ठेऊन पुढील कामाला लागा असेही आवाहन खासदार राऊत यांनी यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना केले.
अरेरे.…! | वासरू जागीच झालं गतप्राण..!
दोडामार्ग : साटेली- भेडशी वरचा बाजार येथे एसटी स्टॉप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका वासराचा मृत्यू झाला आहे. सकाळी बराच वेळ झाला तरी रस्त्यावर पडलेले ते मृत वासरू तसेच रस्त्यावर असल्याचे छायाचित्रात आहे. या निमित्ताने मोकाट जनावरांची समस्या पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मोकाट जनावरे रात्रीची रस्त्यावर थांबल्याने असे प्रकार घडत आहेत. शिवाय बाहेरगावची वाहने येथून रात्री जात असल्याने रात्रीच्या वेळी असे अपघात घडून मुक्या प्राण्यांच्या बळी जात आहेत. इतकचं नव्हे तर या अपघातानी वाहनचालक यांच्या जीवितास सुध्दा धोका आहे. अज्ञात वाहनाने धडक देऊन वासरू मृत झाले असले तरी त्याची विलेव्हाट लावण्यासाठी बराच वेळ कोणी पुढाकार न घेतल्याने या प्रकारांना जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
तुला व्हावेच लागेल आंबेडकरवादी!
…….
तुझा जन्म भारतात झाला असेल तर
तुला व्हावेच लागेल आंबेडकरवादी,
मग तू कोणत्याही जातीचा अस.
आंबेडकरवादी होणे म्हणजे जाती अंताच्या लढाईचा सक्रिय सैनिक होणे आहे तुला.
‘जात मानत नाही’ एवढे म्हणणे पुरेसे नाही तुला.
जात मोडण्याची कृती करणे आहे तुला.
जाती बाहेरचे मित्र जोड,
त्यांच्या हातचे जेवण जेव,
जाती बाहेर लग्न कर.
अगदी आईबापाचा मूर्ख विरोध पत्करून कर!
जात मानणारे उत्सव सोड,
जात मानणारे सण सोड,
जात मानणारे देव सोड.
जातीच्या संघटनेवर बहिष्कार घाल, जातीच्या व्यासपीठावर बहिष्कार घाल.
जातीच्या खेळींना भुलू नकोस.
ते तुझा सत्कार ठेवतील,
तुला पुरस्कार जाहीर करतील.
तेव्हा भिडेखातर गप्प राहू नकोस,
निःसंशय नकार दे.
जिथे दुसर्या जातीतील माणसाला प्रवेश नाही, तिथे तू देखील बहिष्कार घाल.
वाटते तितके सोपे नाही हे.
तुझ्या मेंदूवर जात गोंदलेली असते तुझ्या नकळत!
होय, जात शिकवली जाते जन्मापासून अगदी पाव्हलाव, स्किनर मंडळींची तत्त्वे वापरुन!
म्हणून मनाचे डि-लर्निंग कर.
खानदानाचा अभिमान सोड, कुळ गोत्राचा अभिमान सोड.
नवे शिकण्यापेक्षा जुने सोडणे कठीण असते.
म्हणून मनाला गदगदून काढ.
प्रश्न विचार,
उत्तरांच्या पळवाटा उद्वस्त कर.
विचार मनाला, का नाही एकही भंगी तुझ्या नात्याचा,
का नाही एकही कचरा उचलणारा तुझ्या नात्याचा?
सवयच लाव सतत मनाला शुद्ध करण्याची,
तेव्हाच होईल ‘सर्वेत्र सुखिनः संतु’.
……
डॉ. रुपेश पाटकर.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!💐)
सोने – चांदी तेजीत..!
नवी दिल्ली : आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी म्हणजे सोमवारी सारंगा बाजारात चमक परतली आहे. अमेरिकेची केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरांबाबत आगामी निर्णयापूर्वी विदेशी आणि देशांतर्गत बाजारात स्थिरता नोंदवली गेली.
देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याच्या दरांनी ६२,१०० रुपये प्रति तोळा टप्पा पार केला तर चांदीच्या दरांमध्येही वाढ नोंदवली गेली. यूएस फेड रिझर्व्हची धोरणात्मक बैठक चालू आठवड्यात पडेल, ज्यामध्ये व्याज दरांबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे गुंतवणूकदार फेडच्या बैठकीवर लक्ष ठेवून आहेत.
तळकोकणात ‘या’ ठिकाणी पडली वेश्याव्यवसायावर धाड
वेंगुर्ला : वेंगुर्ला बंदर नजीक असलेल्या वामन गेस्ट हाऊस येथे छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अनधिकृत वेश्या व्यवसायावर वेंगुर्ला पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली आहे. यात एका २५ वर्षीय युवती सहित वेंगुर्ला पिराचा दर्गा येथील अश्रफ इसाक मुजावर (४७) याला वेंगुर्ला पोलिसांनी अटक केली आहे.
वेंगुर्ला वेंगुर्ला बंदर येथील वामन गेस्ट हाऊस मध्ये छुप्या पद्धतीने वारंवार एक किंवा दोन युवतींना आणून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती वेंगुर्ला पोलिसांना मिळाली होती. यानुसार आज १५ जानेवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या सहित वेंगुर्ला पोलिसांच्या टीमने दुपारी ३ वाजताच्या सुमारास वामन गेस्ट हाऊस वर अचानक धाड टाकली. यात मुंबई ठाणे गोवंडीनगर येथील २५ वर्षीय युवती सहित हा वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या अश्रफ मुजावर याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान मुंबई येथील युवतीची वैद्यकीय तपासणी करून तिला सावंतवाडी येथील अंकुर सुधारगृहात रवाना करण्यात येणार असून अश्रम मुजावर याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, पोलीस सुरेश पाटील, अमर कांडर, पांडुरंग खडपकर, बंटी सावंत, योगेश सराफदार, दादा परब, योगेश वेंगुर्लेकर यांनी ही कारवाई केली. दरम्यान आजगाव येथील वेश्या व्यवसायावर धाड टाकल्यानंतर वेंगुर्ला पोलिसांची ही दुसरी धडक कारवाई आहे. यामुळे अनधिकृत वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला | मशिनने नंतर पेट घेतला
मुंबई : येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील साई बाबा चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. या मशीनमधील रोख रक्कम अज्ञात इसमाने शनिवारी
तळकोकणाला पावसाचा फटका…!
सिंधुदुर्ग : काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस लागला. दोडामार्ग तालुक्यात तर जोरदार अतिवृष्टी झाली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस बरसला आहे. त्यामुळे उन्हाळी शेतीचे फार मोठे नुकसान होणार आहे. तर आंबा पिकावर आणि काजू पिकावरही त्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. यावर्षी आंबा आणी काजू पिकाचा मोहोर चांगला असून या पावसामुळे आंबा मोहोर झाडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जत्रोत्सव चालू असून या अवकाळी पावसाचा फटका जत्रोत्सवाला सुद्धा बसताना पाहायला मिळत आहे.