वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात गेल्या सहा सात महीन्यात एकच विषय जास्त चर्चेत हा तो म्हणजे शहरातल्या स्टाॅलचो. कारवाईनंतर उभे रवलेले स्टाॅल आता प्रशासनाची डोकेदुखी ठरतत. एकीकडे हे स्टाॅल काढण्यासाठी एका गटाचो आग्रह आसा तर एका गटाचो विरोध आसा. प्रशासनाची हेच्यात गोची झाली हा.
वैभववाडी तालुको ह्यो जिल्ह्याच्या एका टोकाक असलोला मुलुख. या मुलखात गेल्या काही महिन्यांपासून टपरी म्हणजे स्टॉल वाल्यांचो विषय गाजतात हा.
शहरात सरकारच्या जागेवर तालुक्यात ल्या लोकांनी १२० हून अधिक स्टॉल लावल्यांनी होते. गेले कित्येक वर्षा ते हेच्यातसून आपलो उदरनिर्वाह करीत होते. मात्र, आता नव्यान नगरपंचायत झाल्यावर या नगरपंचायतीक शहराच्या सुशोभीकरण करुक सरकाराकडना पैसो इलो. ह्यो पैसो खर्च करण्यासाठी अनेक विकास कामा लोकप्रतिनिधींनी सुचवलांनी.त्या विकासकामात हे स्टॉल अडचण ठरतत असा सांगून नगरपंचायतीन २२फेब्रुवारीक हे सगळे स्टॉल काढून टाकल्यानी. तेच्यावरना खूप गदारोळ झालो. काययजण तेव्हा जेसीबी खाली झोपले. कारवाई अडवुचो प्रयत्न केल्यानी पण प्रशासनान कारवाई करून संपूर्ण शहर लखलखीत केल्यानंतर पुन्हा जून – जुलै महिन्यात शहरात नव्यान स्टॉल लागले. तेच्यावर नगरपंचायतीन तहसीलदार हेंका पत्र लिहिल्यान हा. हे स्टॉल हटवा म्हणून. मात्र, तहसील कार्यालयान मात्र तेच्या हद्दीतील स्टॉल धारकांकाच नोटीस देऊन स्टॉल काढूक सांगितल्यांनी. उर्वरीत स्टॉल धारक खुशीत हत तेंका अजून कोणाची नोटीस इली नाय. जेंका नोटीस इली ते स्टॉल वाले म्हणत काढलास तर सगळ्यांचे काढा. तरच आम्ही काढतलु. आता हेच्यात प्रशासनाची पण गोची झाली हा.


