कणकवली अपघातात वैभववाडीतील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

वैभववाडी: कणकवली पियाळी पुलाननजीक झालेल्या अपघातात वैभववाडी तांबेवाडी येथील पोलीस कर्मचारी अभि तांबे यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटे ३वाजण्याच्या सुमारास झाला.या घटनेने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

अभि तांबे  हे शुक्रवारी रात्री वैभववाडीतील मित्रांसोबत एका पोलिस मित्राच्या वाढदिवसानिमित्त ओरोस येथे गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून पहाटे माघारी फिरत असतानाच पियाळी पुलाननजीक तांबे  यांचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी थेट रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. यामुळे तांबे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सोबत असलेल्या रुपेश साळवी व प्रतिक बेळेकर यांना गंभीर दुखापत झाली.

अभि तांबे हे सिंधुदुर्ग जिल्हा महामार्ग वाहतूक पोलीसमध्ये सेवा बजावत होते. त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच मित्र परिवाराने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. तांबे यांच्या निधनामुळे संपूर्ण वैभववाडी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles