Homeकोकणसिंधुदुर्गमुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात | एकाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात | एकाचा मृत्यू

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर नांदगाव – पियाळी पुलावर शनिवारी ( आज ) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कारचा अपघात होऊन महामार्ग केंद्र, कसाल येथे नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस हवालदार यशवंत उर्फ (अभिजित) भास्कर तांबे वय 45 राहणार वैभववाडी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

तांबे हे  कसाल येथून आपल्या वैभववाडी गावी जात असताना पियाळी पुलावर आल्यावर त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक ( एमएच १२ केएस १२९९ ) महामार्गावरील डिव्हायडरला आदळली. यामध्ये कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाला होता. यात त्यांचा मृत्यू झाला.

तसेच सोबत असणारे रूपेश विकास साळवी (वय -33 रा. वैभववाडी) व प्रवाशी प्रतीक सोनू बेळेकर (वय – 28 रा. वैभववाडी) यांना गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना उप जिल्हा रुगणालय कणकवली या ठिकाणी अधिक उपचाराकरा करिता पाठविण्यात आले. याबाबतची माहिती  पोलिसांनी दिली. घटनेची माहिती समजतात कणकवली पोलीस आणि वाहतूक पोलीस यांनी धाव घेत मदत कार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments