Sunday, October 19, 2025
Google search engine
Homeकोकणनियती कुटील डाव खेळली |  'रेड सॉईल स्टोरी'चे शिरीष गवस यांचं निधन

नियती कुटील डाव खेळली |  ‘रेड सॉईल स्टोरी’चे शिरीष गवस यांचं निधन

दोडामार्ग  : तालुक्यातील सासोली पाटये पुनर्वसन येथील रहिवाशी व निवृत्त नायब तहसीलदार सत्यवान गवस यांचा मुलगा शिरीष सत्यवान गवस, वय 33 यांचं शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. रेड सॉईल स्टोरी या नावाने सोशल मिडीयावर प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाचा एकच धक्का बसला. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, पत्नी, एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

त्यांच्या निधनानंतर त्याच्या गावी म्हणजे सासोली पाटये येथे घरी सोशल मिडियावरील प्रसीद्ध व्यक्तिंसह अनेकानी अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रूंचा बांध फुटला. शिरीष याचे वडील महसूल विभागात कामाला होते. प्रथम देवगड येथे व नंतर कणकवली येथे तहसील कार्यालयात कामाला असल्याने ते तिकडे स्थायिक झाले होते. त्यांचा मुलगा ही त्यांच्या बरोबर कणकवली येथे राहत होता. मध्यंतरी कोरोनाच्या काळात ते आपल्या मूळ गावी सासोली पाटये येथे राहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांची दोडामार्ग तहसील कार्यालय येथे बदली झाले. त्या दरम्यान शिरीष यांचं लग्न ठरले. पत्नी पूजा हिच्या सोबत ते आपल्या मूळ गावी सासोली पाटये पुनर्वसन येथे राहत होते.

कोरोना काळात शिरीष आणि पूजा गवस यांनी मुंबईतील नोकरी सोडून कोकणात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि ‘रेड सॉइल स्टोरीज’ हे युट्युब चनेल सुरु केले होते. त्यांनी मुंबईतील नोकरी सोडून गावात स्थायिक होऊन, तेथील पारंपरिक जीवनशैली, खाद्यसंस्कृती आणि निसर्गाचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या चॅनलच्या माध्यमातून केले. अल्पवधीत त्यांनी या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या वर्षी त्यांना एक मुलगी झाली. तिचा वाढदिवस त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. हाच व्हीडीओ त्यांच्या सोशल मिडियावरील शेवटचा व्हीडीओ दिसतोय. गेले काही दिवस ते मेंदूच्या आजाराने त्रस्त असल्याची माहिती मिळतेय. शिरीष गवस यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments