Homeकोकणफणस काढायला गेला आणि अस्वलाने घात केला

फणस काढायला गेला आणि अस्वलाने घात केला

दोडामार्ग : वटपौर्णिमेनिमित्त बागेत फणस काढण्यासाठी गेलेल्या मांगेली फणसवाडी येथील विष्णू लाडू गवस, वय 49 यांच्यावर अस्वलाने हल्ला करून जखमी केले. आरडाओरड केल्याने अस्वलाने धूम ठोकली. मात्र गवस यांच्या मांडीवर अस्वलाने हल्ला केल्याने ते जबर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉ अनिकेत गुरव यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी वाटपौर्णिमेचा सण होता. त्या सणाला फणस लागत असल्याने विष्णू गवस हे फणस काढण्यासाठी गेले होते. झाडाच्या बाजूला अस्वल फणस खात होते हे त्यांना निदर्शनास आले नाही. यावेळी गवस फणस काढण्यासाठी झाडाखाली गेले तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या अस्वलाने त्यांच्यावर वार करण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी आपला जीव वाचविण्यासाठी गवस पळू लागले. अस्वलाने गवस यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर मारा केला. अस्वलाची धारदार नखे मांडीवर लागल्याने गवस रक्तबंबाळ झाले. त्यांनी आपला जीव वाचविण्यासाठी आरडा ओरड केली. अस्वलाने पळ काढली म्हणून गवस यांचे प्राण बालबाल बचावले. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या विष्णू गवस यांना तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी गाडीच्या सहाय्याने उपचारासाठी दोडामार्ग रुग्णालयात आणले. डॉ अनिकेत गुरव यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविले.

मांगेली हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. यापुर्वीही अस्वलाने बऱ्याच जणांवर हल्ले केले होते. अस्वल थेट आता वस्ती पर्यंत दिवसा ढवळ्या फिरत असून स्थानिक ग्रामस्थ व पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना भीती वाटू लागलीय. त्यामुळे वनविभागाने याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी आता मांगेलीवासियांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments