Homeकोकणसिंधुदुर्गकुडाळ पोस्ट ऑफिस चौकात कारचा थरार

कुडाळ पोस्ट ऑफिस चौकात कारचा थरार

कुडाळ : कुडाळ शहराचे हृदय मानल्या जाणाऱ्या पोस्ट ऑफिस चौक परिसरात आज सकाळी १०.५० वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारने चांगलाच थरार उडविला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कारने रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. सुदैवाने, या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १०.५० च्या सुमारास एक कार पोस्ट ऑफिस चौकातून जात असताना अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. ही कार मुख्य रस्त्यावरच गोल फिरू लागली. या अनियंत्रित कारने प्रथम रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार एवढ्यावरच न थांबता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कारला जाऊन धडकली.
ज्या वेळी हा अपघात झाला, तेव्हा चौकात पादचारी आणि स्थानिक विक्रेत्यांची मोठी गर्दी होती. कार अचानक गोल फिरत असल्याचे पाहून उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि सर्वांची सैरावैरा पळापळ झाली. आज कुडाळचा बाजाराचा दिवस असल्याने या परिसरात नेहमीपेक्षा जास्त वर्दळ होती. मात्र, सुदैवाने कार कोणाच्याही अंगावर न गेल्याने मोठा अनर्थ टळला.
या विचित्र अपघातात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. आधीच बाजाराचा दिवस आणि त्यातच या अपघातामुळे झालेली गर्दी यामुळे पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments